शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार आज कल्याण दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 10:40 IST

उल्हासनगरमध्ये पार पडणाऱ्या एल्गार परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पवार येत आहेत.

कल्याण, उल्हासनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, सोमवारी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी कल्याणमध्ये येत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार हे उल्हासनगर येथील एल्गार परिषदेसाठी येत आहेत. तत्पूर्वी त्यांची कल्याणमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक पार पडणार आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सिटी पार्क योगीधाम, दिलीप कपोते वाहनतळ, बीएसयूपी उंबर्डे येथील घरांचे वाटप, अग्निशमन दल कार्यालयाचे उद्घाटन या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री शिंदे सोमवारी संध्याकाळी पाच वाजता कल्याणमध्ये येत आहेत. त्याच दरम्यान पवार हे देखील कल्याणमध्ये येत आहेत. 

उल्हासनगरमध्ये पार पडणाऱ्या एल्गार परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पवार येत आहेत. कार्यक्रम उल्हासनगरला असला तरी संध्याकाळी चार वाजून २० मिनिटांनी कल्याण बिर्ला स्कूल येथील पटांगणावर पवार यांचे हॅलिकॉप्टरने आगमन होणार आहे. साडेचार वाजता कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा स्प्रिंग टाइम क्लबमध्ये पवारांची पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार आहे. तेथून संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास पवार हे उल्हासनगरला रवाना होणार आहेत. सहा वाजता दसरा मैदानावर होणाऱ्या एल्गार परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत.