भाजपतर्फे केडीएमसी निवडणूकप्रमुखपदी चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 01:27 AM2021-01-10T01:27:03+5:302021-01-10T01:27:11+5:30

ग्रामपंचायतींचीही जबाबदारी : कोअर कमिटीने केली निर्णयाची घाेषणा

Chavan as KDMC election chief from BJP | भाजपतर्फे केडीएमसी निवडणूकप्रमुखपदी चव्हाण

भाजपतर्फे केडीएमसी निवडणूकप्रमुखपदी चव्हाण

Next

डाेंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपतर्फे आमदार रवींद्र चव्हाण हे निवडणूकप्रमुख असणार आहेत. प्रदेश कोअर कमिटीने शुक्रवारी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

चव्हाण हे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस असून, संपूर्ण कोकण प्रदेश, पालघरपर्यंत संपर्काची आणि तेथील सर्व प्रमुख निर्णयांची जबाबदारीही पक्षाने त्यांना दिली आहे. या क्षेत्रातील ४८ विधानसभा मतदारसंघ व आता होऊ घातलेल्या ग्रामपंचायत अशा सर्व निवडणुकांची बहुतांशी जबाबदारीही पक्षाने त्यांच्यावर सोपविली आहे. याआधीही मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई, पनवेल या महापालिका तसेच कर्जत, माथेरान, अलिबाग, पेण, कुडाळ, सिंधुदुर्ग या भागांतील नगर परिषदा, ग्रामपंचायती निवडणुकांचीही जबाबदारी यापूर्वी त्यांनी सांभाळली होती. त्यापैकी बहुतांशी ठिकाणी पक्षाला बळकटी देण्याचे काम त्यांनी केले.
२०१५च्या यडीएमसी निवडणुकीतही चव्हाण यांच्यावरच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश कमिटीने जबाबदारी दिली होती. तेव्हा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजप युती नसतानाही त्यांनी आठ नगरसेवकांवरून थेट ४२ नगरसेवक निवडून आणत पक्ष बळकट केला होता. त्यामुळे भाजप हा केडीएमसीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला होता. त्यामुळे पक्षाने त्यांना राज्यमंत्रीपद, रायगड आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले होते.

पंतप्रधानांनी केले होते कौतुक
nनवी मुंबईच्या विमानतळाच्या भूमिपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले असताना त्यांनी चव्हाण यांचा दांडगा जनसंपर्क व पक्षासाठी केलेल्या योगदानाबद्दल कौतुक केले होते.
nपक्षासाठी झोकून देऊन कार्य करणारे ते नेते असल्याने या वेळच्या केडीएमसीच्या निवडणुकीचे प्रमुख म्हणून पक्षाने त्यांना जबाबदारी दिल्याने पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Web Title: Chavan as KDMC election chief from BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.