शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेचं आरपीएफ श्वान पथक; बॉम्ब शोधण्यासाठी १८ कॅनाईन हिरो

By अनिकेत घमंडी | Updated: March 13, 2023 16:39 IST

श्वान पथकातील धुर्वा, ऑस्कर, मॅगी, टीपू, डॅनी, जिमी, जिवा आणि बाँड हे काही सर्वात हुशार आणि सक्षम श्वान आहेत ज्यांनी स्फोटके, अंमली पदार्थ शोधण्यात मदत केली आहे.

डोंबिवली : उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यामुळे आधीच धावणाऱ्या गाड्यांव्यतिरिक्त विशेष गाड्या आणि रेल्वे स्थानकांवर होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी, रेल्वे मालमत्ता आणि प्रवाशांची सुरक्षा याला मध्य रेल्वेचे सर्वोच्च प्राधान्य आहे. रेल्वे मालमत्तेच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जबाबदार असलेले रेल्वे संरक्षण दल सुरक्षेच्या उपाययोजना मजबूत करण्यासाठी सर्व शक्य ती पावले उचलते आणि त्यापैकीच एक म्हणजे श्वानपथक हे आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे संरक्षण दलाकडे श्वान पथकाचा भाग म्हणून सुप्रशिक्षित स्निफर श्वानांची एक कार्यक्षम टीम आहे. असे २९ कॅनाईन हिरो असून त्यापैकी १८ बॉम्ब आणि स्फोटके शोधण्यासाठी तैनात आहेत, ४ अंमली पदार्थ शोधण्यासाठी आणि ७ गुन्ह्यांच्या तपासासाठी तैनात आहेत. 

श्वान पथकातील धुर्वा, ऑस्कर, मॅगी, टीपू, डॅनी, जिमी, जिवा आणि बाँड हे काही सर्वात हुशार आणि सक्षम श्वान आहेत ज्यांनी स्फोटके, अंमली पदार्थ शोधण्यात मदत केली आहे. त्यांनी केवळ सुरक्षा कर्मचार्‍यांना मदत केली नाही तर फौजदारी प्रकरणासारखी अनेक समस्या सोडवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या श्वानांना माटुंगा, कर्नाक बंदर, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि कल्याण येथे असलेल्या विशेष केनेल्समध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना हेडकॉन्स्टेबल भरत जाधव, मितेश आंबेकर, कॉन्स्टेबल जेपी गायकवाड, बजरंग नागरगोजे, रवींद्र झांभे, एसजी गायकवाड आणि कॉन्स्टेबल सचिन गुप्ता, किशोर पवार, डीएस यादव, रामवीर सिंग, तानाजी कांबळे आणि योगेश मीना या हँडलर द्वारा प्रशिक्षित केले जाते. 

दरम्यान, यापैकी बहुतेक कॅनाइन हीरो लॅब्राडॉर आणि डॉबरमॅन आहेत, अलीकडे बेल्जियन शेफर्डची काही पिल्ले विकत घेतली गेली आहेत. वर्ष २०२२ मध्ये एकूण १४  कुत्र्यांची पिल्ले खरेदी करण्यात आली.  त्यापैकी ८ लॅब्राडोर आणि १ डॉबरमॅनची पिल्ले मुंबई विभागाला देण्यात आली असून ५ बेल्जियन शेफर्ड्सपैकी ३ पुणे विभागाला आणि प्रत्येकी १ नागपूर व भुसावळ विभागाला देण्यात आली आहे.  या कुत्र्याच्या पिल्लांचे संगोपन आणि त्यांना  प्रशिक्षिण दिले जाईल, जेणेकरून विद्यमान पथकात असलेले श्वान निवृत्त होतील तेव्हा त्यांची जागा घेतील.

मध्य रेल्वेच्या या सुपर डॉग्सनी गुन्ह्यांची उकल करण्यासाठी राज्य सरकारकडून मदत मागितल्यावर त्यांनी रेल्वेबाहेरही आपली क्षमता सिद्ध केली आहे.  या श्वानांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर पदे आणि पदोन्नती दिली जाते. रेल्वे मालमत्तेला आणि प्रवाशांना सुरक्षा प्रदान करण्यात त्यांचे योगदान हे "श्वान माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे" हे घोषवाक्य सिद्ध करते.

टॅग्स :Bombsस्फोटकेdogकुत्राdombivaliडोंबिवलीthaneठाणेrailwayरेल्वे