शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये शिवसेनेसोबत काम करणार नाही, भाजपचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 08:44 IST

वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांची बदली करा; मगच एकत्र काम

लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली : लोकसभा निवडणुकीआधीच शिवसेना-भाजपमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे चित्र गुरुवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होत नाही, तोपर्यंत शिवसेनेसोबत काम न करण्याचा ठराव भाजपने कल्याण जिल्ह्याच्या लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत केला. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांना वाटते तेवढी त्यांची लोकसभा निवडणूक सोपी नसल्याची चर्चा  राजकीय वर्तुळात सुरू होती. आतापर्यंत चर्चा होणे आणि प्रत्यक्ष ठराव करण्यापर्यंत विषय जाणे हे गंभीर असल्याचे मत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

कल्याण लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने आढावा बैठक घेतली. त्यामध्ये मंत्री चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षे कार्यकाळपूर्तीच्या निमित्ताने अभिनंदन ठराव प्रस्ताव ठेवला. त्याला उपस्थित शेकडो पदाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. त्यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद पवार, नेते जगन्नाथ पाटील, आदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली. त्यानंतर भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांनी बागडेंची बदली होत नाही, तोपर्यंत शिवसेनेचे काम न करणे, कार्यक्रमात सहभागी न होणे असा प्रस्ताव सूचक नात्याने मांडला, त्याला सर्वांनुमते अनुमोदन देण्यात आले आणि तो ठराव पारित करण्यात आला.

‘सहकार्यासाठी एकत्र यावे’

आगरी-कोळी वारकरी भवनच्या भूमिपूजन सोहळ्यालादेखील मंत्री चव्हाण अनुपस्थित राहिले. जर ते मंत्री म्हणून केवळ भाजप कल्याण जिल्ह्याचा निर्णय म्हणून तेथे जाणे टाळत असतील, तर येथील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, आदींनीदेखील आपल्याच सहकाऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एकत्र यायला हवे. मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. राजकीय आकसापोटी हा गुन्हा दाखल झाला असून, पोलिस अधिकाऱ्यांनी नि:पक्षपणे कार्यरत असायला हवे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे बागडे या व्यक्तीविरुद्ध नव्हे तर प्रवृत्तीला विरोध असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

 

टॅग्स :kalyanकल्याणBJPभाजपाdombivaliडोंबिवलीShiv Senaशिवसेना