शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

"एकनाथ शिंदेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी; कोट्यवधींचे रस्ते रद्द केलेच कसे?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 09:23 IST

"राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकांमध्ये युतीत इतके वर्षे लढूनही शिवसेनेचे ठाण्याचे नेतृत्व कल्याण-डोंबिवलीत विकासकामांत झारीतील शुक्राचार्याचे काम करत होते."

डोंबिवली : एमएमआरडीएच्या माध्यमातून डोंबिवलीतील  काँक्रिट रस्त्यांची कामे रद्द करण्याचा आदेश देणारे खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदेच असल्याचा गौप्यस्फोट, भाजपचे प्रदेश सरचिटणीस व डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी केला. शिंदे हेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा खळबळजनक वक्तव्यही त्यांनी केले. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्याबाबत वस्तुस्थिती सांगण्यासाठी शिंदे यांनी काढलेल्या आदेशाच्या प्रतीच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर चव्हाण यांनी सादर केल्या. 

मी युती सरकारमध्ये राज्यमंत्री असताना डोंबिवलीत एमएमआरडीएच्या माध्यमातून काँक्रिटचे रस्ते व्हावेत, अशी संकल्पना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडली होती. त्याला फडणवीस यांनी तत्काळ मान्यता दिली. केडीएमसीपेक्षा एमएमआरडीए अधिक चांगल्या प्रकारे रस्ते बांधणी करेल, असेही ठरले. त्या कामासाठी ४७०.८२ कोटी रुपये मंजूर झाले. त्यातून डोंबिवलीतील ३४ रस्ते काँक्रिटीकरण करण्याचे निश्चित झाले. रस्त्यांचा हा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एमएमआरडीएने नऊ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

ते  पुढे म्हणाले की, मी अडीच वर्षे याबाबत पाठपुरावा करत होतो. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची सहन होत नाही व सांगता येत नाही, अशी  देहबोली स्पष्ट दिसत होती. अधिकारी याबाबत प्रचंड दबावाखाली होते. प्राधिकरणातर्फे ३० रस्ते कामे रद्द केल्याचे खासगीत सांगत होते. जेव्हा कागदपत्रे प्राप्त झाली, तेव्हा लक्षात आले की, डोंबिवलीच्या विकासात खरा अडथळा निर्माण करण्याचे काम शिंदे यांच्या आदेशानेच होत आहे. 

केडीएमसीत शिवसेना २३ वर्षे सत्तेत आहे. आजपर्यंत मनपाच्या पाच निवडणुका झाल्या. त्यात शिवसेना-भाजप एकत्र तसेच विरोधात अशी राजकीय लढाई लढलो, पण भाजपने शहर विकासाबाबत कायमच सकारात्मक भूमिकाच निभावली. उलट शिवसेनेने स्थानिक पातळीवरील भाजप कार्यकर्त्यांच्या, नगरसेवकांच्या कामाला शिवसेनेने कायम खोडा घातला. राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकांमध्ये युतीत इतके वर्षे लढूनही शिवसेनेचे ठाण्याचे नेतृत्व कल्याण-डोंबिवलीत विकासकामांत झारीतील शुक्राचार्याचे काम करत होते, असा आरोपही चव्हाण यांनी केला. 

भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या फायली दाबून ठेवल्या केडीएमसीतील भाजप नगरसेवकांच्या फायली दाबून ठेवणे. भाजप आमदारांच्या फायली आयुक्तांवर, प्राधिकरण प्रमुखांवर दबाव टाकून निगेटिव्ह करणे, चांगल्या कंत्राटदारांना केडीएमसीत येऊच न देणे, हे मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच महापालिकांमध्ये सर्रास सुरू आहे. या विरोधात भाजप म्हणून त्या पातळीवर संघर्ष करत असतो, असेही चव्हाण यांनी सांगितले. स्वार्थी हेतूने डोंबिवलीच्या विकासात अडथळा  आणण्याचे काम २० वर्षांपासून शिवसेना करत आहे. हे मुंबई, ठाणे व कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांचे दुर्दैव आहे, असे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेना