शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रात मंत्रिपद देऊन पंतप्रधानांनी ठाणे जिल्ह्याचा वनवास संपवला : कपिल पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 21:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम केले आहे, कपिल पाटील यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कायमच भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम केले आहे, कपिल पाटील यांचं वक्तव्य.

मयुरी चव्हाण "ठाणे जिल्ह्यातील भूमिपूत्रांवर नेहमीच अन्याय होत आला आहे. या  गोष्टीची कल्पना पंतप्रधानांना आली. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी कायमच भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम केले आहे. रामाला तरी १४ वर्षे वनवास भोगावा लागला. मात्र ठाणे जिल्हा ७४ वर्षे वनवास भोगत होता. आता आपल्याला केंद्रात मंत्रिपद देऊन पंतप्रधानांनी जिल्ह्याचा हा वनवास संपवला आहे," असे मत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केले आहे. या विधानातून त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेवर निशाणा साधल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

भाजपाचे  भिवंडी मतदारसंघाचे  खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाल्याने भाजपामध्ये विशेषतः ठाणे जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. सोमवारी ठाण्यामधून  भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेदरम्यान कल्याण शीळ मार्गावरही कपिल पाटील यांचे  जंगी स्वागत करण्यात आले. डोंबिवलीत संघर्ष समितीच्यावतीने त्याच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्काराला उत्तर देताना त्यांनी वरील विधान केले आहे. पुढे पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने आपल्याला केंद्रात काम करण्याची संधी लाभली असून मोदी है तो सब कुछ मुमकिन है असे सांगत त्यांनी भूमिपुत्रांच्या सर्व समस्या आपल्याला माहित आहे. भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम आपण करणार असून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणार आहे. ठाणे जिल्हा ७४ वर्षे वनवास भोगत होता.

जिल्ह्याचा वनवास संपविण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात ठाणे जिल्ह्यातील विविध निवडणूकांमध्ये  विशेष करून शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपाच्या वतीने प्रामुख्याने  कपिल पाटील यांच्या पुढाकाराने रणनीती आखली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीthaneठाणेShiv Senaशिवसेना