शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

खबरदार, नव्या इमारती उभ्या कराल तर... थेंबभरही पाणी मिळणार नाही!

By पंकज पाटील | Updated: November 25, 2023 08:51 IST

अशावेळी नागरिक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेरतात. 

पंकज पाटील

बदलापूर : बदलापूर पालिकेने शहरात तीन वर्षांत ४५० नव्या इमारतींना बांधकाम परवानगी दिली. आणखी २०० इमारतींच्या बांधकामांचा प्रस्ताव आहे. मात्र, खबरदार, नव्या इमारती उभ्या कराल तर एक थेंब पाणी देणार नाही, असा इशाराच नगरपालिका प्रशासनाला जीवन प्राधिकरणाने दिला आहे. प्राधिकरणाची भूमिका शहराच्या विकासात बाधा आणणारी असल्याचे नगरपालिकेचे मत आहे, तर सर्व सोंगे आणता येतील पण पाण्याचे सोंग कुठून आणायचे? असा सवाल प्राधिकरणाचे अधिकारी करीत आहेत.

शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यात प्राधिकरण अपयशी ठरत असून नव्या इमारती उभारताना पालिकेने पाण्याची उपलब्धता तपासावी, असा अलिखित फतवा काढला आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे. लोकसंख्येच्या तुलनेत वाढीव पाणी उपलब्ध होत नसल्याने जीवन प्राधिकरण हतबल झाले आहे. बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुल उभारणीला नगरपालिका परवानगी देत आहे. मात्र या संकुलात वास्तव्याला येणाऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. अशावेळी नागरिक प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेरतात. 

बदलापूर, अंबरनाथला१६ दशलक्ष लिटर्सची तूटn महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांना दररोज १४६ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. n अंबरनाथसाठी ७६, तर बदलापूरसाठी ७० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो. n लोकसंख्येच्या तुलनेत अंबरनाथला ८९, तर बदलापूरला ७४ दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे. त्यामुळे तब्बल १६ दशलक्ष लिटर्स पाण्याची तूट असल्यामुळेच दोन्ही शहरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

जीवन प्राधिकरणामार्फत एमआयडीसीचे मार्केटिंग : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वाढत्या शहराला पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र ते पाणीपुरवठा करू शकत नसल्यामुळे आता प्राधिकरणाचे अधिकारीच आपल्या ग्राहकांना थेट एमआयडीसीकडून पाणी घेण्याचा सल्ला देत आहेत.

अशी चलाखीअनेक इमारतींना एमआयडीसीचे पाणी बदलापूरच्या शिरगाव परिसरामध्ये नव्याने विकसित होणाऱ्या अनेक गृहप्रकल्पांनी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन थेट एमआयडीसीकडे वाढीव पैसे भरून एमआयडीसीचा पाणीपुरवठा सुरू केला आहे.

जलदगतीने विकास होणाऱ्या शहरांच्या यादीत बदलापूर असल्यामुळे या ठिकाणी गृहसंकुलांची परवानगी रोखता येणार नाही. प्राधिकरणाने पर्यायी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यातच अनेक विकासक आता स्वतःहून एमआयडीसीकडून पाणी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पाण्याची अनुपलब्धता हे कारण विकासाला बाधा ठरू नये एवढीच अपेक्षा आहे.- योगेश गोडसे, मुख्याधिकारी, बदलापूर

बदलापूर शहराला पाच एमएलडी अतिरिक्त पाण्याची गरज आहे. वाढीव पाणी मिळत नसल्यामुळे समस्या झाली आहे. नवीन इमारतींना केवळ पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे शक्य होते. इतर वापरासाठी पाणी देणे भविष्यात अवघड जाईल. पालिका आणि जीवन प्राधिकरण यांनी एकत्रितपणे ही समस्या सोडवणे गरजेचे आहे.- माधुरी पाटील, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

टॅग्स :Waterपाणीbadlapurबदलापूरthaneठाणे