शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमटीच्या बाळासाहेब ठाकरे आगाराची दुरावस्था, मनसे पदाधिकाऱ्याने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 17:57 IST

परिवहन उपक्रमाने 2015 साली वसंत व्हॅली येथे बस आगार सुरु केला होता. त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले होते. महापालिकेस जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत 10 एसी बसेस उपलब्ध झाल्या होत्या.

कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिहवन उपक्रमांतर्गत वसंत व्हॅली येथे 2015 साली सुरु करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे आगाराची दुरावस्था झाली आहे. याकडे मनसे माजी परिवहन सदस्य इरफान शेख यांनी लक्ष वेधले आहे. 

परिवहन उपक्रमाने 2015 साली वसंत व्हॅली येथे बस आगार सुरु केला होता. त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले होते. महापालिकेस जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत 10 एसी बसेस उपलब्ध झाल्या होत्या. या एसी बसेस वसंत व्हॅली आगारात ठेवण्याची सोय होती. त्या ठिकाणाहून नवी मुंबईला या बसेस सोडण्यात येत होत्या. आज त्याठिकाणी परिवहनच्या अन्य बसेस उभ्या आहेत. पावसामुळे त्याठिकाणी गवत आणि अन्य झुडपे उगवली आहेत. त्यात हे आगार झाकले गेले आहे. 

आगाराला प्रवेश द्वार नाही. त्याठिकाणी बस उभ्या आहे. आगाराची पूर्णपणो दुरावस्था झाली आहे. महापालिकेने त्याठिकाणी अन्य भंगार वाहने ठेवली आहे. आगार हे भंगार वाहने ठेवण्यासाठी आहे की, बसेस चालविण्यासाठी, असा सवाल उपस्थित करीत या विषयीची पोस्ट शेख यांनी फेसबूकवर पोस्ट केली आहे. महापालिकेत गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. तरीही बाळासाहेब ठाकरे परिवहन आगाराची दुरावस्था  होते. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, याकडे शेख यांनी लक्ष वेधले आहे. परिवहन व्यवस्थापन आणि सत्ताधा:यांच्या अनास्थेविषयी खंत व्यक्त केली आहे. प्रशासनाने या प्रकरणी मौन बाळगले आहे. 

दरम्यान शिवसेनेचे उप शहर प्रमुख रवी पाटील यांनी सांगितले की, शेख यांच्या फेसबूक पोस्टची शिवसेनेने गंभीर दखल घेत प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता कोविड काळात आगाराकडे दुर्लक्ष झाले आहे. मात्र येत्या 8 दिवसात आगाराच्या ठिकाणी वाढलेले गवत आणि झुडपे काढली जातील. तसेच भंगार वाहने ही हटविली जातील. 

 

टॅग्स :kalyanकल्याणMNSमनसे