शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

मला फार लवकर मोठी माणसे भेटल्याने मी लिखाण करू शकलो : अच्युत गोडबोले

By अनिकेत घमंडी | Updated: January 13, 2024 15:04 IST

गोडबोले स्वामी विवेकानंद पुरस्काराने सन्मानित राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पुरस्काराचा रौप्य महोत्सवी वर्षाचा सोहळा

डोंबिवली: मला फार लवकर मोठी माणसं भेटली यामुळे मी एवढे लिखाण करू शकलो या लिखाणामुळेच मला हा पुरस्कार मिळाला आहे. माणसाने प्रत्येक गोष्टीवर का हा प्रश्न विचारला म्हणून विज्ञानाची निर्मिती झाली. मानवाने विज्ञान आयुष्यात वापरायला सुरुवात केली त्यातून तंत्रज्ञान निर्माण झाले. हेच तंत्रज्ञान आता प्रगत होऊन कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे प्रतिपादन प्रख्यात लेखक अच्युत गोडबोले यांनी केले. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सवी स्वामी विवेकानंद पुरस्कार गोडबोले यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांच्या हस्ते शुक्रवारी स्वामी विवेकानंद शाळेच्या दत्तनगर शाखेत प्रदान करण्यात आला.

शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे त्याचे स्वरूप होते. हा पुरस्कार दरवर्षी स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने देण्यात येतो. त्यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष संजय कुलकर्णी ,उपाध्यक्ष विद्याधर शास्त्री,कार्यवाह शिरिष फडके , सहकार्यवाह प्रमोद उंटवाले, कोषाध्यक्ष अमित भावे उपस्थित होते. हा पुरस्कार सोहळा संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, छत्रपती भवन, आयरे रोड, दत्तनगर येथे पार पडला.

स्वामी विवेकानंद पुरस्कार स्विकारल्यानंतर गोडबोले मार्गदर्शन करतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले।की, राष्ट्रीय शिक्षण संस्थेतील वातावरणाने भारावून गेलो. लहानपणीच्या आठवणीने उजाळा देत गणित विषयातील आवडीमुळे उदाहरणे तीन तीन प्रकारे सोडवली . त्याचबरोबर घरी विविध साहित्यिकांचे येणे जाणे असल्याने लेखक होऊ शकलो. व मराठी भाषेमध्ये लिखाण केल्याचे म्हटले. कृत्रिम बुद्धिमत्ता पुढील काही वर्षात एवढी वाढणार आहे की निर्माता व ग्राहक यामध्ये सरळ संवाद होईल मध्यस्थीची भूमिका राहणार नाही. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नोकरी कपात होईल. कामाचे स्वरूप देखील बदलत जाईल. त्याचप्रमाणे कामासाठी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. तंत्रज्ञान हे झपाट्याने बदलत असल्याने आपण तज्ञ होण्याची गरज आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलकर्णी यांनी केले. संस्था ही ठाणे जिल्ह्यात आपल्या शहराचे नेतृत्व करीत असून येथील विद्यार्थी विविध कला क्रीडा तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तमोत्तम काम करीत आहेत असे म्हटले. सत्कारमूर्तींचा परिचय संस्था सदस्य राजाराम पाटील यांनी करून दिला. सत्कारमूर्तींना देण्यात आलेल्या मानपत्रचे वाचन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, अरुणोदय माध्यमिक शाळेचे शिक्षक डॉ. सुनील पांचाळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेतील शिक्षिका मेधा कांबळी यांनी केले.आभार सहकार्यवाह प्रमोद उंटवाले यांनी मानले. यावेळी गेल्या २४वर्षात विविध मान्यवरांना दिलेले स्वामी विवेकानंद पुरस्कार चित्रफित सादरीकरणाद्वारे दाखवण्यात आले. पुरस्काराच्या सुरुवातीला विष्णुनगर प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांनी शारदे वंदन तव पायी" हे ईशस्तवन तर विष्णुनगर मध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भ्रमर गुंजले रसिक रंगले" हे स्वागत गीत सादर केले. .तसेच विष्णुनगर माध्यमिक शाळेतील विद्यार्थी तुषार योगेश देशमुख याने कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्ण वंदे मातरम् म्हटले. त्याचबरोबर संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या डॉ. रघुनाथ माशेलकर बालवैज्ञानिक पुरस्कारांची घोषणा कार्यवाह शिरीष फडके यांनी केली. यामध्ये प्राथमिक विभागाचा पुरस्कार रामचंद्रनगर इंग्रजी माध्यम मधील विद्यार्थीनी समिक्षा घनश्याम मोरे हिला तर माध्यमिक विभागाचा पुरस्कार विष्णुनगर शाळेचा विद्यार्थी मयुरेश वाल्मीक आसने यांनी मिळविला. यावेळी अरुणोदय माध्यमिक शाळेने अंतराळ यानाची प्रतिकृती तयार करून तिचे प्रक्षेपण दाखवणारा प्रकल्प साकारला होता . याची संकल्पना शाळेच्या मुख्याध्यापिका सविता मगर , रामचंद्र नगर शाळेच्या मुख्याध्यापका व पुरस्कार सोहळा व्यवस्था प्रमुख सौ. उर्मिला चव्हाण व शिक्षक रवींद्र पवार यांची होती,तसेच यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग होता.