शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

'व्यासपीठावर दिसण्याने आघाडी, युती ठरत नसते'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

By अनिकेत घमंडी | Updated: February 24, 2024 15:53 IST

डोंबिवलीत माध्यमांशी साधला संवाद

डोंबिवली: महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरू ती योग्य नाही. महायुतीत जाण्याच्या वावड्या, चर्चांवरही भाष्य करताना ते म्हणाले।की, स्पष्टच सांगतो, या फक्त चर्चा आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही. व्यासपीठावर दिसण्याने आघाडी घडत किंवा युती ठरत नसतात, असं म्हणत महायुतीत समावेश होण्याच्या चर्चांना पूर्णविराम देत ठाकरेंनी पडदा टाकला. त्यांनी सध्याच्या राजकारणावर सडकून टीका केली.

ते म्हणालेकी, विधानभवनात एका कार्यक्रमात गेलो तेव्हा समोर बसलेले आमदार कोणत्या पक्षात आहेत हेच कळत नव्हतं. अशा प्रकारचं वातावरण कधी पाहिलं नव्हतं. लोकांनी यांना वठणीवर आणले पाहिजे. जोपर्यंत लोक यांना वठणीवर आणत नाही तोपर्यंत राज्यकर्त्यांना आपण बरोबर करतोय असेच वाटणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल होणार असल्याची टीका त्यांनी केलीय.

देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीसाठी मोर्चेबांधणी करू लागलाय. मनसे देखील यावेळी लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे. त्यादृष्टीने आगामी निवडणुकीसाठी मनसेकडून चाचपणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे हे दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी कल्याण मधील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर शनिवारी ते  डोंबिवली येथे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतत त्यांनी राजकीय परिस्थितीवर सडेतोड टीका केली.

मराठा आरक्षण, निवडणूक आयोग, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष चिन्ह, आमदार अपात्रता सुनावणीवरही राज ठाकरेंनी भाष्य केलं. अनेक तरुण राजकारणात येऊ इच्छितात मात्र त्यांच्या समोरच राजकारण सुरू आहे ते पाहून तरुण वर्ग राजकारण येणार नाही. या गोष्टीचा निर्णय जनतेने घेणे गरजेचे आहे, अन्यथा महाराष्ट्राच काही खरं नाही असे सांगितले. राज्यात सुरू असलेल्या मराठा ओबीसी वादाबाबत बोलतांना राज्यातील बेरोजगारी, पाणी समस्या या सगळ्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे आधार घेतले जातात. महाराष्ट्र सारख्या श्रीमंत राज्यात अशा प्रकारचे वाद सुरू असतील तर हे वाद कोणीतरी घडवतोय असाही आरोप त्यांनी केला. 

ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर थेट टीका केली. पवार यांच्या पक्षाचे तुतारी या चिन्हाचे अनावरण रायगडावर करण्यात आले त्यावरून त्यांनी पवारांना लक्ष्य केलं. महाराष्ट्रातले महापुरुष जातीपाती मध्ये विभागून टाकलेत , आजपर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणारे पवार यांना आजच का रायगड आठवला असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला.

महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष सध्या महाराष्ट्रात अनेक प्रश्न असून दुष्काळी स्थिती आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीच राजकारण पुढं केलं जात असल्याचे ठाकरे म्हणालेत. आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या प्रकरणावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्याची वेळ का आली? एवढं टोकाचं पाऊल त्यांनी का घेतलं? याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे, न्यायालय, तपास यंत्रणा ते करेलच आणि सत्य समोर येईलच असेही ते म्हणाले. मराठी भाषेला अभिषेक दर्जा मिळण्याबाबतचे मागणे अद्याप पूर्ण झालेली नाही. याबाबत बोलताना ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना याबाबत काही देणं घेणं नाही. त्यासाठी राज्यातले पक्ष सत्तेवर आले पाहिजेत,तेच अशा प्रकारचा दबाव टाकू शकतात असे सांगून वर्षांनुवर्षं तेच सांगत असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेdombivaliडोंबिवली