शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पोटाची खळगी भरण्यासाठी 'त्यांना' करावी लागते जीवघेणी कसरत; PHOTO पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 18:51 IST

आता या गावकऱ्यांची समस्या कधी मार्गी लागेल? प्रशासन लोकप्रतिनिधी या गोष्टीचे गांभीर्य ओळखून पुढाकार घेतात का? हे पहावे लागेल.

कल्याण- एकीकडे आपण स्मार्ट सिटी आणि डिजिटल इंडियाच्या गप्पा करत आहोत. इतकंच नाही तर लवकरच आपण 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. एकीकडे कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे या शहरांत मोठमोठे प्रकल्प होऊ घातले आहेत. मात्र या शहरांपासून जवळच असलेल्या कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या आपटी गावातील नागरिक आजही मरण यातना भोगत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी गावातील लोकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. हा प्रवास पाहून तुमच्याही अंगवार शहारा येईल. 

लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला या नदीवरून टाकण्यात  आलेल्या लोखंडी खांबावरून  पायी चालतात. थोडा जरी तोल चुकला तरी थेट उल्हास नदीत पडून वाहून जाण्याची भिती या गावकऱ्यांना असते. मात्र ही टांगती तलवार असतानाही नाईलाजाने हा प्रवास  ग्रामस्थांना करावाच लागतो. 

आपटी, बारे, चोण, मांजर्ली, दहागाव, वाहोली, कुंभारपाडा, बांधणेपाडा या गावात पहिले शेती केली जायची मात्र त्यानंतर आजूबाजूला एमआयडीसी झाल्याने रोजगारासाठी ग्रामस्थ बाहेर पडू लागले. 

वाढणारी लोकसंख्या आणि नव्याने वसलेली शहरे यांना पाणी पुरवठा कमी पडू लागल्याने एमआयडीसी ने या आपटी बंधाऱ्याच्या उंची वाढविली, तसेच बंधाऱ्याच्या खाली आपटी जांभूळ वसद, आदी गावातील लोकांना येण्याजाण्यासाठी एक ते दिड मीटर रुंदीची साधारण ५०० मीटर लांबीची पायवाट तयार करून देण्यात आली होती. ये जा करण्यासाठी ग्रामस्थ हा रस्ता वापरत होते. मात्र दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरात पायवाटेचा काही भाग  वाहून गेला. यामुळे एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना उल्हास नदीवरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.दुस-या मार्गाने जायचे असेल तर 20 ते 25 किलोमीटर लांबून वळसा मारावा लागतो. एकीकडे उपासमार टाळण्यासाठी हा भयंकर प्रवास  करावा लागतो तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्याने 25 किमी लांबच्या पल्ल्याहून प्रवास करणे परवडेनासे झाले आहे.यामुळे आता या गावकऱ्यांची समस्या कधी मार्गी लागेल? प्रशासन लोकप्रतिनिधी या गोष्टीचे गांभीर्य ओळखून पुढाकार घेतात का? हे पहावे लागेल.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणेriverनदी