शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

डोंबिवलीच्या शेजारी आकाराला येतेय १२ लाख लोकसंख्येची दुसरी डोंबिवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 05:44 IST

कोटीचा फ्लॅट घेणारे लक्षावधी समस्यांनी त्रस्त; गाजर दाखविले, म्हणून घरे घेतली, आता फक्त पश्चात्ताप

मुरलीधर भवार

कल्याण : भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावर एकेकाळी कच्ची-पक्की बैठी घरे होती. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवासी लुटमारीच्या भीतीने घाबरायचे. गेल्या काही वर्षांत या रस्त्यालगतच्या भूखंडांवर किमान पाच ते सहा बिल्डरांचे टाऊनशिप प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मंजूर केले आहेत.

येत्या दोन वर्षांत किमान एक ते दीड लाख फ्लॅटमध्ये किमान सहा ते सात लाख लोक राहायला येतील. त्यांना पाणी, वाहतूक, रस्ते, सुरक्षा अशा कोणत्याही सुविधेचे नियोजन एमएमआरडीएने केलेले नाही. महापालिकेने आपला संबंध नाही असे म्हणत हात वर केले आहेत.मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे मार्गाचा दुवा ठरणारा भिवंडी-कल्याण-शीळ रस्ता सहा पदरी काँक्रिटीकरणाचा झाला आहे. याच भागात कल्याण, तळोजा आणि ठाणे-कल्याण मेट्रो रेल्वे प्रकल्प येणार असे गाजर दाखवून बिल्डरांनी घरे विकली. मात्र महागडी घरे घेणे लोकांना महागात पडले आहे.

नागरिकांवर कराचा बोजा कशाला? इंटिग्रेटेड टाऊनशिप अंतर्गत बड्या बिल्डरांना बांधकाम परवानगी दिल्यावर गृह संकुलाच्या कार्यक्षेत्रात पायाभूत सोयी सुविधा त्यांनीच उभारायच्या आहेत. त्यामुळे घर घेणाऱ्यांना मालमत्ता कर कमी आकारला गेला पाहिजे. महापालिकेने या घरातील नागरिकांकडून ६६ टक्के अतिरिक्त कर वसूल केला आहे. त्याची रक्कम २५ कोटींच्या आसपास आहे. तो कमी करण्याची मागणी असताना त्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला नाही. स्टेशनपासून परिसर दूर असल्याने रिक्षा चालक या परिसरात रिक्षा घेऊन येण्याकरिता रात्री-अपरात्री तोंडाला येईल ते भाडे सांगतात.

बड्या टाऊनशिपला एमएमआरडीने परवानगी दिल्या आहेत. त्या बड्या प्रकल्पातील घनकचरा व्यवस्थापन त्यांनी करायचे आहे. ते होत नसल्यास कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. पाणीपुरवठा एमआयडीसी करते. वितरण महापालिका करते. मालमत्ता कराच्या फेरमूल्यांसाठी समिती नेमली आहे. समितीचा अहवाल येताच निर्णय घेतला जाईल. नागरिकांच्या मागणीनुसार बससेवा सुरू केली जाईल. - डॉ. भाऊसाहेब दांगडे, आयुक्त, कल्याण डोंबिवली महापालिका

राज्य शासनाला महसूल मिळतो, म्हणून एमएमआरडीएने बड्या बिल्डरांना मनमानी परवानग्या दिल्या. नव्या प्रकल्पात घर घेणाऱ्यांना असंख्य समस्यांचा सामना करावा लागतो. पलावा उड्डाणपूल, पाणीटंचाई, जास्तीचा मालमत्ता कर, वाहतूक कोंडी या सगळ्या मुद्द्यावर राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. ज्या प्रमाणात पाणी कोटा मंजूर आहे, तो मिळत नाही. मोरबे धरणाच्या बदल्यात १४० दशलक्ष लीटर पाण्याचा कोटा या भागाकडे वळविल्यास पाण्याची समस्या उद्भवणार नाही. - राजू पाटील, मनसे आमदार, कल्याण ग्रामीण

रिक्षा चालकांना वेसण घालण्याची गरजकेडीएमटीने डोंबिवली, ठाकुर्ली आणि कल्याण स्टेशनमधून रिजेन्सीपर्यंत आणि रिजेन्सी ते वाशी नवी मुंबई विशेष बससेवा सुरू करावी. रेल्वे स्थानकातून रिजेन्सी, रुणवाल प्रकल्पाकडे रिक्षाने येण्यासाठी १०० ते १२५ रुपये भाडे आकारले जाते. रात्रीच्या वेळी १५० ते १७५ रुपये भाडे घेतले जाते. मीटरवर रिक्षा सुरू करण्याची आणि रिक्षाचालकांच्या मनमानीला आरटीओने वेसण घालण्याची गरज आहे.

मे महिन्यात आम्हाला पाणी टंचाईची समस्या जाणवली. बिल्डरने पाण्याची व्यवस्था केली आहे, तसेच संकुलात देऊ केलेल्या सोई-सुविधा आहेत, पण भविष्यात सर्व रहिवासी वास्तव्याला आल्यावर समस्या बिकट होतील. - लता अरगडे, रिजेन्सी अनंत प्रकल्पातील रहिवासी

वाहतूक कोंडीचे स्पॉट झाले तयारपलावा सर्कल येथे वाहतूक कोंडी होते. तोडगा म्हणून पलावा उड्डाणपुलाचे सुरू केलेले काम संथगतीने सुरू आहे. रिजेन्सी प्रकल्पातून बाहेर पडताच कल्याण शीळ रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. रुणवालच्या ठिकाणी उड्डाणपूल उभारावा लागणार आहे.

प्रकल्पाचा अर्धा भाग ठाणे महापालिका हद्दीत आहे. जेवढी घरे बांधली तेवढा पाण्याचा कोटा घेतला नव्हता. स्टेशनपासून २० मिनिटांचा अंतरावर घरे आहेत, अशी जाहिरात केली. रस्त्यातील खड्डे, वाहतूक कोंडीमुळे घरी जाण्यास तासभर लागतो. - रंजित काकडे, रुणवाल प्रकल्पातील रहिवासी

पाणी समस्येला आम्ही जबाबदार नाहीनव्या प्रकल्पांना  पाणीपुरवठा करण्याचे काम एमआयडीसीचे आहे. त्यांनी कमी दाबाने पाणी दिले की, पाणी समस्या उद्भवते. याचा महापालिकेशी काही संबंध नाही. - किरण वाघमारे,  उपअभियंता, पाणीपुरवठा, महापालिका