शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत फेरीवाल्यांकडून आयटी इंजिनिअर तरुणाला मारहाण

By मुरलीधर भवार | Updated: December 23, 2023 16:15 IST

शहराच्या पूर्व भागातील श्रीखंडे वाडी परिसरात सुधीर पगारे हा तरुण त्याच्या कुटुंबासह राहतो.

डोंबिवली-स्टेशन परिसरातील मधूबन थिएटरजवळ एका तरुणाला फेरीवाल्याचा धक्का लागला. याचा जाब तरुणाने फेरीवाल्यास विचारला. या गोष्टीचा राग आल्याने तीन चार फेरीवाल्यांनी तरुणाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सुधीर पगारे असे आहे. तो आयटी इंजिनिअर आहे. फेरीवाल्यांकडून त्याला मारहाण झाल्याने रस्ते आणि फूटपाथ आडवून बसणाऱ््या फेरीवाल्यांची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे.

शहराच्या पूर्व भागातील श्रीखंडे वाडी परिसरात सुधीर पगारे हा तरुण त्याच्या कुटुंबासह राहतो. एक दिवसापूर्वी तो काही कामानिमित्त डोंबिवली स्टेशन मधूबन थिएटरच्या गल्लीत गेला होता. तो त्या ठिकाणाहून जात असताना त्याला एका फेरीवाल्याचा धक्का लागला. सुधीर याने त्या फेरीवाल्याला जाब विचारला. जाब विचारल्याने रागात आलेल्या फेरीवाल्यासह चार ते पाच फेरीवाल्यानी सुधीर याला पकडून मारहाण केली. या घनटेमुळे फेरीवाल्याची दादागिरी उघड झाली आहे.

सुधीर पगारे यांचे म्हणणे आहे की, मी डोंबिवलीचा सुशिक्षित सभ्य नागरीक आहे. मी महापालिकेला टॅक्स भरतो. परंतू चालण्यासाठी मला रस्ता मोकळा नाही. फूटपाथ नाही. जो रस्ता आहे. त्यावर फेरीवाले बसले आहेत. जेव्हा मी त्यांची तक्रार करतो. त्यांच्याकडून मला मारहाण केली जाते. ही गुंडागर्दी कधी थांबणार आहे? पोलिस आणि महापालिका काय करते ? असा संतप्त सवाल सुधीर यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन गीते सांगितले की, या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणाऱ््या फेरीवाल्यांचा शोध सुरु आहे. त्यांच्या विरोधात ठोस कारवाई केली जाईल. दोन महिन्यापूर्वी कल्याण स्टेशन परिसरात एका मराठी तरुणाला फेरीवाल्यानी मारहाण केली होती. त्या आधी डोंबिवलीत एका रुग्णवाहिकेच्या चालकास फेरीवाल्यांनी मारहाण केली होती. त्या  पाठोपाठ आज डोंबिवलीतील तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवली