शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 22:53 IST

Air India Flight AI171 Crash : दोन वर्षांपासून एअर इंडियात कामाला होती. लहानपणापासून तिला एअर होस्टेस व्हायचे होते, ते तिचे स्वप्न होते.

अनिकेत घमंडी/प्रशांत माने, डोंबिवली

डोंबिवली: अहमदाबाद दुर्घटनेत डोंबिवलीकर रहिवासी रोशनी सोंनघरे(२७) रा. उमिया बिल्डींग, तळमजला, राजाजी पथ, मढवी बंगल्याजवळ डोंबिवली पूर्व हिचे निधन झाले. ती दोन वर्षांपासून एअर इंडियात कामाला होती. तिला एअर होस्टेस व्हायचे होते ते तिचे स्वप्न अधुरे राहिल्याची खंत कुटुंबीयांनी व्यक्त केली.

तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. भाऊ विघ्नेश हा शिपिंग कंपनीत कामाला आहे. वडील राजेंद्र सोनघरे टेक्निशियन म्हणून काम करतात. रोशनी या आधी स्पाईस जेट या विमान कंपनीत कामाला होती. लहानपणापासून तिला एअर होस्टेस व्हायचे होते, ते तिचे स्वप्न होते. आई राजश्री सोनघरे हिच्याशी ती अपघातापूर्वी सकाळी फोनवर बोलली होती, तेच तिचे घरच्यांशी शेवटचे संभाषण झाल्याचे सांगण्यात आले. घटना कळताच तिचे वडील, भाऊ हे अहमदाबाद येथे रवाना झाले आहेत. कंपनीने अद्याप त्यांना याबाबत काहीही कळवले नसल्याचे सांगण्यात आले. तिचे लग्न ठरल्याचीही नातेवाईकांत चर्चा सुरू होती.

आई घरीच असून आईचा भाऊ रोशनीचा मामा प्रवीण सुखदरे यांनी त्याबद्दल माहिती दिली. डोबिवलीत रहायला येण्याआधी ते ग्रँटरोड येथे वास्तव्याला होते, तिचे सर्व शिक्षण तेथेच झाले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने हे यश संपादित केले होते. मध्यमवर्गीय घरातील रोशनी हिच्या निधनामुळे डोंबिवली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार राजेश मोरे, माजी नगरसेवक मुकुंद पेडणेकर, मंदार हळबे आदींनी तिला श्रद्धांजली वाहिली.

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडिया