शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंच्या भेटीनंतर आठवडाभरातच पक्षाला रामराम; प्रकाश भोईर 'मनसे' बाहेर, भाजपात प्रवेश करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 06:50 IST

चव्हाण यांनी यावेळी भारत माता की जय आणि वंदेमातरम, भाजपचा विजय असो अशा घोषणा दिल्या. तसेच प्रकाश भोईरही लवकरच अशा घोषणा करतील, असेही चव्हाण म्हणाले होते

डोंबिवली - मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष, माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि सरोज भोईर यांनी पदाचा आणि पक्ष सदस्यत्त्वाचा शुक्रवारी राजीनामा दिला. समाजकारण आणि राजकारणातील प्रवास हा त्यांचे गुरू, सहकारी कार्यकर्ते, नागरिक, हितचिंतक यांच्या मताचा, भावनांचा आदर यावर अवलंबून असल्याने त्यांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले.

भोईर यांना मनपाचे विरोधी पक्षनेतेपद पक्षाने दिले होते. गेल्याच आठवड्यात त्यांनी नेते राजू पाटील यांच्यासमवेत शिवतीर्थ येथे जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून भोईर यांच्याशी भाजप, शिंदेसेनेचे नेते संपर्कात असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध केले होते.

अलीकडेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा आ. रवींद्र चव्हाण यांच्या निधीतून माजी नगरसेवक प्रकाश भोईर, सरोज भोईर यांच्या प्रभागाचा भाग असलेल्या डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रोडवरील अनमोल नागरी ते साईनगर परिसरात १५० मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेतले होते.  त्या कामाचा प्रारंभ रविवारी झाला. चव्हाण यांनी यावेळी भारत माता की जय आणि वंदेमातरम, भाजपचा विजय असो अशा घोषणा दिल्या. तसेच प्रकाश भोईरही लवकरच अशा घोषणा करतील, असेही चव्हाण म्हणाले होते. त्यामुळे भोईर लवकरच भाजपवासी होतील अशी शक्यता वर्तविली जात होती. त्यात त्यांनी आता मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Prakash Bhoir Quits MNS After Meeting Raj Thackeray; Joins BJP?

Web Summary : Kalyan MNS leader Prakash Bhoir resigned, hinting at joining BJP. Citing supporters' advice, he quit after meeting Raj Thackeray. BJP leader Ravindra Chavan's recent remarks fuel speculation about Bhoir's move to BJP after infrastructure work in his area.
टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे