शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला दोन दिवसाची पोलिस कोठडी

By मुरलीधर भवार | Updated: September 3, 2024 20:13 IST

न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कल्याण- बदलापूरमधील शिशू वर्गात शिकणाऱ्या दोन लहान मुलींवरील लैगिंक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज पुन्हा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बदलापूर प्रकरणातील पिडीत मुलींवर झालेल्या लैगिंक अत्याचार प्रकरणात शाळेसमोर आणि रेल्वे स्थानकात मोठे आंदोलन करण्यात आले. आराेपी अक्षय शिंदेला अटक करुन फाशी देण्याची मागणी करण्यात आली. पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे याला अटक करुन कल्याण जिल्हा सत्र न्यायालयासमोरील पोक्सा विशेष न्यायालयासमोर हजर केले होते. त्याला २६ ऑगस्टपर्यंत  पोलिस कोठडी होती. त्यानंतर त्याला पुन्हा २६ ऑगस्ट रोजी हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्याची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली. दोन पिडीत मुलीपैकी एकाच मुलीवरील अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या पिडीत मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यावर आरोपी अक्षय शिंदे याला पुन्हा कल्याण न्यायालयात हजर केले गेले. त्याला न्यायालयाने दुसऱ्या मुलीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर त्याची कल्याण न्यायालयात ओळख परेड घेण्यात आली. पिडीत मुलीने आरोपी अक्षय शिंदे याला ओळखले हाेते. हाच तो काठीवाला दादा अशी पीडित मुलीने अक्षयची ओळख सांगितली होती.

तपास पथकाने आरोपी अक्षय शिंदे याला दुसऱ्यांदा कल्याण न्यायालयात हजर केले होते. तेव्हा तपास कामी पोलिस कोठडी मागण्याचा अधिकार राखून ठेवला होता. आरोपी अक्षय शिंदे यांची ओळख परेड झाली असली तरी त्याचा मोबाईल अद्याप हस्तगत करण्यात आलेला नाही. मोबाईल हस्तगत करुन त्याने अन्य मुलींसोबत हा प्रकार केला आहे की नाही ? हे तपासण्याकरीता आरोपी अक्षय शिंदे याला पुन्हा कल्याण न्यायालयातील जिल्हा सत्र न्यायाधीश पी. पी. मुळे यांच्या समोर हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिल अश्वीनी भामरे पाटील यांनी आरोपीला तपास कामी ५ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केली होती. न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदे याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :badlapurबदलापूर