शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दारू पार्टीत क्षुल्लक वादातून तरुणाची हत्या; मानपाडा पोलिसांनी आरोपीला केली अटक

By मुरलीधर भवार | Updated: January 24, 2024 18:21 IST

याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

कल्याण- दोन मित्र पार्टनरशीपमध्ये चायनीज गाडी सुरू करणार होते. या आनंदात दोघांनी पार्टी दिली. मात्र या दारू पार्टीमध्ये क्षुल्लक वादातून दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून एका मित्राने मित्राचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व भागातील आडीवली परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अब्दुल उर्फ वाजिद सय्यद असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी परेश शीलकर या तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

मलंग रोड परिसरात राहणारा परेश शिलकर आणि अब्दुल उर्फ वाजीद सय्यद हे पार्टनरशीपमध्ये चायनीजची गाडी सूरु करणार होते . दोघांची तयारी झाली होती .काही दिवसातच यांचे चायनीज सेंटर सुरू होणार होते .यामुळे वाजिद सय्यद आणि परेश शिलकर यांनी त्याच्या मित्रांनी काल अडवली परिसरातील एका नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या ठिकाणी पार्टी दिली होती. या ठिकाणी त्यांचे मित्र देखील होते. पार्टी सुरु असताना वाजिद आणि परेश या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून परेशने वाजिद सय्यद याच्यावर लोखंडी पत्र्याने हल्ला केला, त्यात वाजिदचा मृत्यू झाला. वाजीदवर हल्लाकरुन त्याला जीवे ठार मारल्यावर परेशने स्वत: पोलिस नियंत्रम कक्षाला फोन करून या घटनेची माहिती दिली. मानपाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परेशला ताब्यात घेतले. या प्रकरणी मानपाडा पोलिस पुढील तपास करत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस