शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kalyan: कल्याणमध्ये इमारतीला लागलेली भीषण आग आटोक्यात, रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण

By मुरलीधर भवार | Updated: November 15, 2023 21:56 IST

Kalyan Building Fire: कल्याण  शहराच्या पश्चिम भागातील खडकपाडा परिसरातील अमृत हेवन इमारतीमधील दहाव्या मजल्यावरील एका घराला आज रात्री आठ वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली. तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

- मुरलीधर भवारकल्याण - कल्याण  शहराच्या पश्चिम भागातील खडकपाडा परिसरातील अमृत हेवन इमारतीमधील दहाव्या मजल्यावरील एकाघराला आज रात्री आठ वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे कळताच इमारतीमधील नागरीकांनी इमारतीच्या बाहेर धाव घेतली. आगीत दहाव्या मजल्यावरील घर जळून खाक झाले आहे. या घटनेत सुदैवाने जिवित हानी झालेली नाही. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्यांनी धाव घेऊन तातडीने आग विझविण्याचे काम केले. तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील घराला आग लागली. इमारतीच्या रहिवासीयांनी सांगितले की, ज्या घराला आग लागली त्या घरातील रहिवासी हे सणा निमित्त घराबाहेर होते. त्यामुळे त्यात जिवीत हानी झालेील नाही. आग कशामुळे लागली असल्याचे कारण अग्नीशमन दलाकडून सांगण्यात आले नाही. मात्र नागरीकांनी सांगितले की, दिवाळीचा फटाके घरातील ग’लरीवर पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा. त्याची ठिणगी उडून ती दहाव्या मजल्यावरील घराच्या ग’लरीतील पडद्यावर पडली असावी. त्यातून ही आग लागली असावी. ही ठिकणी आकराव्या मजल्यावरील घरातून खाली दहाव्या मजल्यावरील घरावर पडल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. ११ व्या मजल्यावरील घरही धुराने कोंडले होते. आग लागल्याचे कळताच नागरीकांनी भिती पोटी घराच्या बाहेर धाव घेतली. इमारतीच्या आवारात लोक जमले होते.

आग इतरत्र पसरु नये यासाठी अग्नीशमन दलाने तातडीने बंबाद्वारे पाण्याचा फवारा सुरु केला. तसेच इमारतीचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. इमारतीतील प्रत्येक रहिवासी एकमेकांना तुम्ही सुखरुप आहात ना अशी विचारपूस करीत होता. आज भाऊ बीजेचा सण असल्याने अनेकांच्या घरी आनंदाचे वातावरण होते. इमारतीली नागरीक फेस्टीवल मूडमध्ये होते. मात्र आगीने त्यांच्या आनंदाचा हिरमोड केला. आसपासच्या इमारतीली नागरीकांनीही अमृत हेवन इमारतीच्या ठिकाणी गर्दी करुन त्याठिकाणी राहणाऱ््या नागरीकांची विचारपूस केली. अग्नीशन दलाच्या जवानांनी इमारतीच्या दहाव्या मजल्यावर दोन्ही बाजूने पाण्याचा जोरदार फवारा मारुन आग आटोक्या आणली. त्यानंतर इमारतीचा वीज पुरवठा सुरळित करण्यात आला.

इमारतीमधील वयोवृद्ध आणि आजारी नागरीक इमारतीच्या तळ मजल्याच्या आवारात येऊन खाली बसले होते. अन्य नागरीकांनी त्यांना दिलासा दिला. इमारतीमधील अग्नीशमन यंत्रणा लवकर सुरु होत नव्हती. त्यामुळे अग्नीशमन दलाच्या जवानांना सुरुवातीला थोडे जास्तीचे प्रयत्न करावे लागले.

टॅग्स :kalyanकल्याणfireआगFire Brigadeअग्निशमन दल