शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

रेल्वेचा अजब कारभार, जुलैनंतर करणार डोंबिवली स्थानकातील अर्ध्या छताचे काम!

By अनिकेत घमंडी | Updated: June 6, 2024 13:48 IST

ट्विट करून प्रवाशाला दिलं उत्तर, डोंबिवलीकरांचा यंदाचा प्रवासही भर पावसातच

अनिकेत घमंडी, डोंबिवली: सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या डोंबिवलीरेल्वे स्थानकात फलाट ५ वर पाच वर्षे अर्धवट शेड आहे, प्रवाशांनी वेळोवेळी तक्रारी।केल्या, केंद्राच्या यात्री उपभोक्ता समितीने त्याबाबत सातत्याने आवाज उठवला मात्र रेल्वे प्रशासन त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता करू, बघू अशी थंड भूमिका घेऊन प्रवाशांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवत आहे.

आता तर जुलै नंतर बघू असे म्हणत रेल्वेने प्रवाशांची थट्टा केली असल्याचा संताप कौस्तुभ देशपांडे याने व्यक्त केला. कौस्तुभने याबाबत बुधवारी रेल्वे प्रशासनाला ट्विट करून फलाट ५ ची समस्या मांडली होती, त्यावर रेल्वेने उत्तर देत आता जुलै नंतर त्या कामाचे बघू असे प्रतिउत्तर दिल्याने त्याने संताप व्यक्त।केला. रेल्वेचे स्टेशन मास्तर झोपा काढतात की काय असा सवाल करत त्याने रेल्वेला काम का झाले नाही याचा जाब विचारला आहे. म्हणजे यंदाही प्रवाशांनी पावसात भिजत प्रवास करायचा का? त्या गडबडीत एखाद्याचा रेल्वे अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल करत त्याने रेल्वे प्रशासनाला पुन्हा प्रतिउत्तर देत सवालांचा भडिमार केला.

प्रवाशांप्रति सुविधा देताना हात आखडता का घेता, दैनंदिन लोकल गाड्या लेट चालवत आहात त्याचे काही वाटत नाहीच, पण आता फलाटात उभं राहताना तरी सुविधा द्या असा सवाल करत त्याने रेल्वे अधिकारी बेजबाबदार असल्याचे म्हंटले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीrailwayरेल्वे