शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

 थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित ग्राहकांकडून वीजचोरी; टिटवाळा उपविभागातील १०१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

By अनिकेत घमंडी | Updated: February 23, 2023 18:44 IST

थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित ग्राहकांकडून वीजचोरी केल्याप्रकरणी 101 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डोंबिवली: थकीत वीजबिलापोटीवीजपुरवठा खंडित करून वीज मीटर काढल्यानंतरही वीजचोरी करणाऱ्या टिटवाळा उपविभागातील १०१ जणांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात वीजचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. महावितरणच्या पथकाने टिटवाळा, गोवेली व खडवली परिसरात धडक कारवाई करून ३३ लाख ७८ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणलेल्या ग्राहकांचा यात समावेश आहे.

थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या वीज ग्राहकांची तपासणी करण्याचे निर्देश महावितरणच्या मुख्य कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली टिटवाळा उपविभागात तपासणी मोहिम राबवण्यात आली. टिटवाळा शाखा कार्यालयांतर्गत मौर्या नगर, वैष्णवी चाळ, रेणूकानगर चाळ, जयशंकर चाळ, जाधवनगर चाळ, गोवेली रोड, टिटवाळा व बल्याणी परिसरात १६ ग्राहकांकडे ५ लाख ३९ हजार रुपयांची वीजचोरी आढळली. गोवेली शाखा कार्यालयांतर्गत बेलकर पाडा, आदिवासी वाडी, मुम्हसरुंडी, मामनोली, कुंदे, रायते, भिसोल, नालिंबी, घोटसर, म्हारळ, वरप, नवगाव, कोलम परिसरात ७० ग्राहकांकडे सुरू असलेली १४ लाख २९ हजार रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली. तर खडवली शाखा कार्यालयांतर्गत फळेगाव भागात १५ ग्राहकांकडे १४ लाख १० हजार रुपयांची वीजचोरी आढळली.

थकबाकीपोटी एकदा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकीत वीजबिलाचा भरणा व पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय संबंधित ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला जात नाही. तर अशा ग्राहकांनी परस्पर वीजजोडणी, शेजारी किंवा इतरांकडून वीज घेतल्याचे आढळल्यास संबंधित ग्राहक व त्यांना वीज पुरविणारा अशा दोघांविरुद्धही फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येते. टिटवाळ्याचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार, सहायक अभियंते धनंजय पाटील, निलेश महाजन व कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे यांच्या टिमने ही कारवाई केली. 

 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीelectricityवीज