शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावातील जागेचा एक गुंठ्याला ५० लाख भाव देण्यात यावा, शेतकऱ्यांची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: November 8, 2023 17:59 IST

एका गुंठ्याला ५० लाख रुपयांचा भाव दिला जावा अशी मागणी शेतकरी आणि भूमीपूत्रांची आहे.

कल्याण - कल्याण डाेंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावातील जमीनाचा भाव रेडी रेकनर नुसार एका गुंठयाला ९ लाख ८० हजार रुपये दिला जात आहे. मात्र हा दर शेतकरी आणि भूमीपूत्रांना मान्य नाही. एका गुंठ्याला ५० लाख रुपयांचा भाव दिला जावा अशी मागणी शेतकरी आणि भूमीपूत्रांची आहे.२७ गावातील भूमीपूत्र विक्रम पाटील यांनी सांगितले की, २७ गावात डेडीकेट फ्रेट कॉरिडॉर हा रेल्वेचा दिल्ली ते जेएनपीटी मालवाहतूक गाड्यांचा विशेष प्रकल्प आहे.या प्रकल्पात २७ गावातील शेतकरी वर्गाच्या जमीनी बाधित झालेल्या आहे. याशिवाय विरार अलिबाग कॉरिडोर प्रकल्प आहे. त्याचबरोबर २७ गावातील १० गावात कल्याण ग्रोथ सेंटर उभारले जाणार आहे. या ठिकाणी चार रस्ते विकासीत केले जात आहे. त्याच्या जागेचे हस्तांतर कल्याण प्रांत कार्यालकडून एमएमआरडीएला करण्यात आले आहे.

या विविध प्रकल्पात बाधितांच्या जामीनी बाधित होत आहे. त्यांना सरकारने जाहिर केलेल्या रेडी रेकनर नुसार एका गुंठ्याला ९ लाख ८० हजार रुपयांचा दर निश्चीत केला आहे. या दरानुसार अडीच पट मोबदला दिला जात आहे. अडीच पटानुसार २१ ते २२ लाख रुपये एका गुंठ्याला शेतकरी आणि भूमीपूत्राला मिळू शकतात. मात्र २७ पैकी १० गावात कल्याण ग्रोथ सेंटर आहे. याठिकाणी बड्या गृहसंकुलाचे प्रकल्प सध्या सुरु आहे. या प्रकल्पात सदनिकेेची किंमत ३० ते ३५ लाख रुपये आहे. ही किंमत किमान किंमत आहे. भविष्यात हा दर वाढणार आहे. मग अडीचपट मोबदल्यानुसार २१ ते २२ लाख रुपये भूमीपूत्र आणि शेतकऱ्यांनी का घ्यायचे. २७ गावांपैकी १८ गावे वगळण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका न्याय प्रविष्ट आहे.

राज्य सरकारने २७ पैकी १८ गावे वगळून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे तांत्रिक दृष्ट्या गावे महापालिकेत आहेत. जर हा मुद्दा ग्राह्य धरला नाही तर ही गावे ग्रामीणमध्ये आहेत. ग्रामीणमध्ये २७ गावे ग्राह्य धरल्यास रेडीरेकनर दरानुसार ९ लाख ८० हजार प्रति गुंठ्यानुसार पाच पट मोबदला दिला गेला पाहिजे. याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे. या मागणीचा राज्य सरकारने विचार करावा अशी पाटील यांची मागणी आहे.

टॅग्स :kalyanकल्याणFarmerशेतकरी