शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण : कचऱ्यापासून खत तयार करणाऱ्या सोसायट्यांना ५ टक्के मालमत्ता करात सवलत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 18:33 IST

कर वसूलीवरून राजकारण तापल्याने नागरिकांना केडीएमसीचे आवाहन

ठळक मुद्देकर वसूलीवरून राजकारण तापल्याने नागरिकांना केडीएमसीचे आवाहन२०२० पासून शून्य कचरा मोहीम

कल्याण-कल्याणडोंबिवली महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन कराची वसूली सुरु केल्याने त्याला भाजपने तीव्र विरोध केला. भाजप पाठोपाठ मनसेनेही विरोध केला. मात्र या कर आकारणीवरुन शिवसेना भाजपमध्ये चांगली जुंपून बॅनरबाजी सुरु झाल्याने आत्ता महापालिकेने कर वसूलीस नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नागरीकांना केले आहे. तसेच ज्या सोसायट्या कचऱ्यायापासून खत तयार करीत आहे. त्यांना मालमत्ता करात पाच टक्के सवलत दिली जाईल असे स्पष्ट केले.कर वसूली स्थगित करण्यात यावी अशी मागणी राजकीय पक्षांकडून केली जात आहे. केंद्र सरकारने ८ एप्रिल २०१६ रोजी नागरी घनकचरा नियमावली लागू केली आहे. त्यानुसार कर लागू करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने १९ डिसेंबर २०१९ मध्ये अधिसूचना प्रसिद्ध करुन सूचना हरकती मागविल्या होत्या. त्यानंतर १ जुलै २०१९ मध्ये अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करुन ही कर वसूली  सुरु करण्याचे आदेश दिले. सर्व पालिकांनी ही कर वसूली ११  जुलै २०१९ पासून लागू करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महापालिकेने हा कर लागू करुन त्याची वसूली सुरु केली आहे. केवळ कल्याण डोंबिवली महापालिकेने हा कर लागू केला नसून अन्य महापालिकांमध्येही त्यांची अंमलबजावणी सुरु आहे. ज्या सोसायट्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन खत तयार करीत आहेत .अशा सोसायट्यांना मालमत्ता करात पाच टक्के सवलत दिली जाईल असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. 

२०२० पासून शून्य कचरा मोहीम

महापालिकेने मे २०२० पासून शून्य कचरा मोहिम हाती घेतली आहे. ही मोहीम महापालिका क्षेत्रत प्रभावीपणो राबविली जात आहे. त्याचा परिमाण म्हणून आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात आले आहे. आधारवाडीवर टाकण्यात येणारा कचरा उंबर्डे आणि बारावे प्रकल्पाच्या ठिकाणी टाकला जात आहे. त्याचबरोबर उंबर्डे, आयरे, बारावे, कचोरे या ठिकाणी प्रत्येकी १० टन क्षमतेते बायोगॅस प्रकल्प सुरु आहेत. तसेच सीएसआर फंडातून बारावे येथे २५ टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्पही सुरु आहे. कचरा मुक्त महापालिका करण्यासाठी प्रशासनाचे विविध प्रयत्न सुरु आहे. त्याचा एक भाग म्हणून कचरा कर वसूल केला जात आहे. नागरीकांनी त्यास सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.आयुक्तांचा सत्कारआधारवाडी डंपिंग ग्राऊंड एका वर्षात बंद करण्यात आले. त्यामुळे लाखो नागरीकांची दुर्गंधीपासून सुटका झाली आहे. तसेच महापालिकेचे वर्षाला साडे पाच कोटी रुपये वाचले आहेत. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही किमया साधल्याने बांधकाम व्यावसायिक प्रकाश लेले, प्रफुल्ल गवळी, डॉ. केदार परांजपे, पारसमल जैन यांनी आयुक्तांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीMaharashtraमहाराष्ट्र