शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

कायद्याने वागा लोकचळवळीचा २०२३ चा फातिमाबी-सावित्री पुरस्कार घोषित

By मुरलीधर भवार | Updated: January 20, 2023 15:26 IST

पुरस्कार वितरण २८ जानेवारी रोजी केसी गांधी शाळेत सायंकाळी पाच वाजता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते  केले जाणार आहेत, अशी माहिती कायद्याने वागाचे अध्यक्ष राज असरोंडकर यांनी दिली आहे.

कल्याण : विविध क्षेत्रात उल्लेखीनय कामगिरी करणाऱ्या महिलांना कायद्याने वागा लोकचळवळीतर्फे पुरस्कार फातिमाबी-सावित्री पुरस्कार दिला जातो. दोन्ही वर्षातील पुरस्कार घोषित झाले आहेत. पुरस्कार वितरण २८ जानेवारी रोजी केसी गांधी शाळेत सायंकाळी पाच वाजता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते  केले जाणार आहेत, अशी माहिती कायद्याने वागाचे अध्यक्ष राज असरोंडकर यांनी दिली आहे.

उल्हासनगर मनपा अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, पत्रकार किरण सोनवणे, गंगोत्री फाऊंडेशनच्या अध्यक्ष सोनिया धामी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या फातिमाबी - सावित्री उत्सवाचं स्वागताध्यक्षपद सामाजिक कार्यकर्ता अॅड. उदय रसाळ यांच्याकडे आहे. इंटरसेक्स लिंग समानता तसंच एलजीबीटीक्यूआयए समुहांचं जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत डॅनिएल्ला मेंडोंसा, ट्रेनमध्ये भीक मागता मागता त्याच पैशांची बचत करून कॅमेरा विकत घेऊन भारतातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट होण्याचा मान पटकावलेली झोया लोबो, रहनुमां संस्थेच्या माध्यमातून दुर्गम भागात कम्युनिटी लायब्ररी चालवणारी सादिया शेख, कॅन्सरसारख्या आजाराला मात देत जिद्दीने शिकत आपल्या स्वप्नांकडे झेपावणारी रिया भूतकर आणि तालवाद्यांवरील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढीत आपला स्वतंत्र ठसा उमटवलेली ढोलकपटू निशा मोकल यंदाच्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या फातिमाबी- सावित्री पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.

गेल्यावर्षी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांमुळे कार्यक्रम होऊ शकला नव्हता. नावं घोषित होऊनही पुरस्कार वितरण होऊ शकलेलं नव्हतं. बँकेतून निवृत्त झाल्यावर कोकणातील ग्रामीण भागात स्थायिक होऊन निवृत्तीनंतर मिळालेला पैसा सामाजिक कार्यावर खर्च करून महिला रोजगार निमिर्तीसाठी धडपडणाऱ्या रत्नागिरीतील देवरुखच्या रुबिना चव्हाण, बीड जिल्ह्यातील प्रतिकूल परिस्थितीत दारुबंदी, बालविवाह प्रतिबंध विषयांवर तसंच कौटुंबिक हिंसाचाराविरोधात कार्यरत माजलगावच्या सत्यभामा सौंदरमल, २५ वर्षांपूर्वी कौमार्य चाचणी विरोधात उभं ठाकून सामाजिक बहिष्काराचा धैर्याने सामना करणाऱ्या मुंबईतील अरुणा इंद्रेकर, मराठी साहित्यात स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या पुण्याच्या कल्पना दुधाळ आणि उच्च शिक्षण असतानाही आपल्या गावच्या आधुनिक विकासासाठी राजकारणात उतरलेल्या रत्नागिरीतील कशेळी गावच्या सरपंच सोनाली मे स्त्री २०२२ च्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या फातिमाबी-सावित्री पुरस्काराच्या मानकरी आहेत. दोन्ही वर्षांचे मिळून यंदाच्या कार्यक्रमात एकूण १० पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती फातिमाबी सावित्री उत्सवाचे समन्वयक वृषाली विनायक व राकेश पद्माकर मीना यांनी दिली. 

टॅग्स :kalyanकल्याण