शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील गिरणी कामगारांना कल्याणमध्ये १९ हजार घरे; रायते गावात ५६ एकरांचा भूखंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 07:24 IST

प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवणार

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: गिरणी कामगारांना घरांसाठी कल्याणच्या ग्रामीण भागातील रायते गावात ५६ एकरचा भूखंड प्रतिचौरस मीटर एक रुपया भाडेकराराने म्हाडाला देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येणार आहे. याठिकाणी गिरणी कामगारांकरिता कायमस्वरूपी १९ हजार घरे देण्यासाठी म्हाडाचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईत घाम गाळलेल्या गिरणी कामगारांना तेथेच घरे देण्याच्या प्रयत्नांना अपयश आले असून, अखेर कोकण व घाटावरील या कामगारांना उपनगरात आसरा घ्यावा लागणार आहे.

या संदर्भात मुंबई गिरणी कामगार युनियनचे सरचिटणीस एकनाथ माने यांनी सांगितले की, गिरणी कामगारांचा प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीत चर्चेला आला होता. बहुतांश गिरणी कामगार हे काेकणातील आणि घाटावरचे रहिवासी असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री  चव्हाण यांनी गिरणी कामगारांना त्यांच्या मूळ गावी घरे देण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याला गिरणी कामगारांचा विरोध होता. कोकणात आणि घाटावर घरे न देता मुंबईत आणि मुंबई उपनगरातच घरे दिली जावी, अशी मागणी त्याचवेळी गिरणी कामगारांनी केली होती.

आतापर्यंत केवळ १२०० गिरणी कामगारांना घरे

मुंबईतील गिरणी कामगारांचा १९८२ मध्ये मोठा संप झाला होता. संप चिघळल्याने गिरणी कामगार देशोधडीला लागले. संप झाला तेव्हा गिरणी कामगारांची संख्या जवळपास ७५ हजार होती. त्यानंतर गिरणी कामगारांच्या घरासाठी ज्या कामगारांनी दावा केला, त्यांची संख्या १ लाख ७५ हजार होती. आतापर्यंत केवळ १२०० गिरणी कामगारांना घरे मिळाली आहेत. कल्याणमध्ये गिरणी कामगारांसाठी १९ हजार घरे बांधली जाणार असतील तर मोठ्या संख्येने कामगारांच्या घरांचा प्रश्न सुटू शकण्यास मदत होणार आहे. 

घरकुल योजनेकरिता आरक्षण

  • कल्याणमधील गौरी पाडा हा परिसर कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत आहे. हेदूटणे हे गाव महापालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांपैकी आहे. रायते हे गाव कल्याण ग्रामीणमध्ये समाविष्ट आहे.
  • घरकुल योजनेकरिता अशा प्रकारचे आरक्षण विकास आराखड्यात आहे का, अशी विचारणा महापालिकेच्या सहायक संचालक नगररचना विभागाकडे केली असता, त्यांच्याकडून घरकुल योजनेकरिता आरक्षित भूखंड नसल्याचे सांगण्यात आले.
टॅग्स :kalyanकल्याणMumbaiमुंबईHomeसुंदर गृहनियोजन