शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

'ती' 14 गावे नवी मुंबईत समाविष्ट केली जाणार; पालकमंत्र्यांचा दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 01:29 IST

ही 14 गावे नवी मुंबई महपालिकेत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी आज विधानसभेत मनसे आमदार राजू पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली. यावेळी त्यांच्या मागणीनुसार ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यास नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.

कल्याण - कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघात असलेली 14 गावे नवी मुंबई महपालिकेत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी आज विधानसभेत मनसे आमदार राजू पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली. यावेळी त्यांच्या मागणीनुसार ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यास नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे आमदार राजू पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. 

विधानसभेचे अधिवेशन आटोपून आमदार पाटील हे त्यांच्या पलावा येथील कार्यालयात परतले. तेव्हा त्याठिकाणी 14 गावे सर्व पक्षी संघर्ष समितीचे पदाधिकारी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी थांबले होते. पाटील यांचे आगमन होताच समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासह पालकमंत्र्यांचे आभार मानले. आमदार पाटील यांनी सांगितले की,  कोविडमुळे अधिवेशन होत नव्हते. काल अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. आज 14 गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याची लक्षवेधी मांडली. ही गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केली जातील, असा दुजोरा  पालकमंत्री शिंदे यांनी दिला आहे. हा लढा त्याठिकाणच्या संघर्ष समितीचा आहे. याचे सर्व श्रेय त्या गावातील एकजूटीला देत असल्याचे मान्य करीत आमदार पाटील यांनी पालकमंत्र्याचे आभार मानले आहेत.यावेळी संघर्ष समितीचे लक्ष्मण पाटील यांनी सांगितले की, आमच्या 14 गावांत पाच ग्रामपंचायती होत्या. ग्रामपंचायतीमुळे पाहिजे तसा गावांचा विकास होत नव्हता. गेल्या तीन निवडणूकांवर आम्ही बहिष्कार टाकला होता. आमची गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यात यावीत अशी आमची मागणी होती. ही मागणी मनसे आमदार पाटील यांनी उचलून धरली. त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना पालकमंत्री शिंदे यांनी गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात येतील असे मान्य केले आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRaju Patilराजू पाटीलMNSमनसेNavi Mumbaiनवी मुंबईkalyanकल्याण