शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

138 कोटींच्या प्रकल्पामुळे शिव मंदिर परिसराचा कायापालट; लवकरच काम सुरू

By पंकज पाटील | Updated: October 10, 2023 15:20 IST

१६ फेब्रुवारी, २०२३ रोजी राज्य शासनाने शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या १३८.२१ कोटी किंमतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली

अंबरनाथ:  अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम आता मंजूर झाले असून या कामाला येता काही दिवसातच सुरुवात करण्यात येणार आहे. 138 कोटीच्या या प्रकल्पामुळे संपूर्ण शिव मंदिर परिसराचा कायापालट होणार आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून अवघ्या एका वर्षात हे काम पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.        

१६ फेब्रुवारी, २०२३ रोजी राज्य शासनाने शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाच्या १३८.२१ कोटी किंमतीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या सर्व मंजुरीचा अडथळा पार करत अंबरनाथ पालिकेच्या वतीने काही महिन्यांपूर्वी सुशोभीकरणाच्या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता या कामाचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या सुशोभीकरणाचे १०७ कोटींचे काम आता सुरू होत आहे. याकरिता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. सावनी हेरिटेज कंझर्वेशन प्रा.  ली. या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्मारक पुरातत्व विभागाच्या अटी आणि शर्तीचे पालन करुन हा परिसर भाविकांसाठी एक चांगले पर्यटन क्षेत्र बनवण्यात येणार आहे. या कामाच्या उभारणीनंतर शिव मंदिर परिसराला नवी झळाळी प्राप्त होणार असून केवळ देशभरातच नव्हे तर जगभरात अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर एक धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून जगभरात परिचित होणार आहे.

सुशोभीकरनासाठी काळा दगडांचा वापर : प्राचीन शिव मंदिर हे पुरातन असल्यामुळे या मंदिराचे सुशोभीकरण करत असताना काळापासून यचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे. मंदिराचा पुरातत्त्व महत्त्व कायम ठेवण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.

कामातील वैशिष्ट्य : या सुशोभीकरणाच्या प्रस्तावात प्रवेशद्वार, प्रवेशद्वारासमोरील चौकात नंदी, वाहनतळ,  प्रदर्शन केंद्र, अँम्पी थिएटर ,  संरक्षक भिंत, मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते, क्रिडांगण आणि स्वच्छतागृह, चेक डॅम , भक्त निवास , वालधुनी नदीवर घाट आणि संरक्षक भिंत यांसारखी कामे या प्रकल्पांतर्गत केली जाणार आहे. 

 

टॅग्स :ambernathअंबरनाथTempleमंदिरkalyanकल्याण