शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

१२ जिहादी डोंबिवलीचे? शाळा, कॉलेजमध्ये स्फोटाची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 07:43 IST

शाळा, कॉलेजमध्ये स्फोटाची धमकी : तीन पथके तयार

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ‘स्कूल के साथ साथ मुंबई के रेल्वे स्टेशनोंपर भी धमाका होगा...’ असा मजकूर असलेला मेल ठाणे पोलिसांच्या शाळेला आला आहे. कुर्बानीसाठी ५० जिहादी तयार असून, त्यात डोंबिवलीतील १२ मराठी जिहादींच्या नावांची यादीच दिली आहे. त्याद्वारे लहान मुले आणि सामान्य माणसांचे जीवही जातील, असेही या धमकीमध्ये म्हटले आहे. या प्रकरणाच्या शोधासाठी ठाणेनगर पोलिसांची दोन तर सायबर गुन्हे शाखेचे एक अशी तीन पथके तयार केली आहेत. 

ऐन प्रजासत्ताक दिनाच्या तीन दिवस आधी ‘लष्कर’च्या नावाने हा धमकीचा मेल आल्याने  ठाणे  पोलीस  वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागासह स्थानिक ठाणेनगर पोलिसांचीही दोन पथके या प्रकरणाचा तपास करत आहेत. २१ जानेवारी २०२२ रोजी ठाणे पोलीस स्कूलच्या मेल आयडीवर लष्कर २२  नावाने हा मेल आला आहे. ही धमकी देणाऱ्याने स्वत:चे नाव जावेद खान असे सांगितले असून, आपण लष्कर २९चा प्रमुख असल्याचा दावाही केला आहे. हिंदुस्थान मे जिहाद का पालन हो, इतकेच आपले लक्ष्य असून, त्यासाठी कुर्बानी आणि धमाका या दोन मार्गाचा अवलंब केल्याचे म्हटले आहे. ५० जिहादी यासाठी तयार आहेत. त्यात डोंबिवलीतील १२ मराठी जिहादींची नावेही टाकली आहेत. इथली शिक्षण व्यवस्था बंद करुन त्याऐवजी मदरसाद्वारे शिक्षण व्यवस्था सुरू झाली पाहिजे, यासाठी मुंबईतील शाळा, कॉलेज आणि काही रेल्वे स्थानकांवर धमाके केले जातील, अशी दर्पोक्तीही यातून दिली आहे. 

जिहाद भारतातील घराघरात पोहोचविणे हेच मिशन २०२२ आहे. आपण दहशतवादी नसल्याचा दावा यात केला आहे. जिहादसाठी अनेक मुजाहिद (आत्मघात करणारे) आमच्याकडे कुर्बानीसाठी तयार आहेत. पोलिसांनी पकडावे, असे आव्हानही यात दिले आहे. 

भाषा दहशतवाद्यांची, मात्र दिशाभूल करण्याचा प्रकार पत्रातील भाषा जरी दहशतवाद्यांसारखी असली तरी हा दिशाभूल करण्याचाही प्रकार असण्याची शक्यताही एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. पत्राची सर्वच बाजूंनी चौकशी केली जात आहे. मात्र, ठोस कोणतीही माहिती अजूनही पुढे आलेली नसल्याचे ठाणेनगर पाेलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले.

 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीSchoolशाळा