शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

खाेटी कागदपत्रे देऊन आणखी १,००० बांधकामे, एमसीएचआयचा गौप्यस्फोट, बेकायदा बिल्डरांवर ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 09:26 IST

कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा बांधकाम करणाऱ्या ६५ बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेकडून परवानगी मिळाल्याचे भासवून ‘रेरा’कडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविल्याचे उघड झाले.

कल्याण : अधिकृत बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना सर्व नियम, कायदे पाळावे लागतात. मात्र, बेकायदा बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना कुठलीही बंदी नसते; परंतु अधिकृत बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांचीही बदनामी होते आणि डोकेदुखी वाढते. ‘रेरा’ला खोटी कागदपत्रे सादर करून कल्याण-डोंबिवलीतच नव्हे, तर राज्यभरातून एक हजार बेकायदा बांधकाम नोंदणी प्रमाणपत्रे मिळविली असल्याचा गौप्यस्फोट कल्याण-डोंबिवली क्रिडाई एमसीएचआयचे माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी केला. 

कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा बांधकाम करणाऱ्या ६५ बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेकडून परवानगी मिळाल्याचे भासवून ‘रेरा’कडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविल्याचे उघड झाले. याचा एसआयटी आणि ईडीकडून तपास सुरू आहे. हे प्रकरण उघडकीस आणणारे वास्तुविशारद संदीप पाटील यांच्या धाडसाचे एमसीएचआयने कौतुक केले. मात्र, या प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू असल्याने कल्याण-डोंबिवलीतील अधिकृत बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची बदनामी होत आहे. यावेळी एमसीएचआयचे अध्यक्ष भरत छेडा, पदाधिकारी अरविंद वरक, विकास वीरकर, राहुल कदम, दिनेश मेहता, संजय पाटील, रोहित दीक्षित आणि सुनील चव्हाण आदी उपस्थित होते. 

पाटील म्हणाले की, महापालिकेची परवानगी नसताना खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ‘रेरा’ला बांधकाम नोंदणी करण्याची शहानिशा ‘रेरा’ प्राधिकरणाकडून होणे गरजेचे आहे. यात घर घेणारा सामान्य माणूस भरडला जातोय. त्याची आर्थिक फसवणूक झाली आहे.  कारण बेकायदा बांधकामात घर घेणाऱ्यांची नोंदणी केली जात नाही. त्यांना कर लागत नाही. 

आता प्रमाणपत्रासाठी ५ महिने लागतातया प्रकरणामुळे अधिकृत बांधकाम व्यावसायिकांचीच नव्हे, तर कल्याण-डोंबिवली शहराची बदनामी झाली आहे. ‘रेरा’कडून यापूर्वी अधिकृत बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना  दहा दिवसांत बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र मिळत होते. आता त्याला तीन ते पाच महिने लागत आहेत. हे सगळे प्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एमसीएचआयमार्फत लवकरच भेट घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

 

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे