यू मुम्बाने तेलगू टायटन्सला ४१-२० असे लोळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 03:36 AM2018-10-24T03:36:18+5:302018-10-24T03:36:28+5:30

अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात यू मुम्बाने प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या इंटर झोन सामन्यात बलाढ्य तेलगू टायटन्सला ४१-२० असे लोळवले.

Yu Munda rolled the Telugu Titans to 41-20 | यू मुम्बाने तेलगू टायटन्सला ४१-२० असे लोळवले

यू मुम्बाने तेलगू टायटन्सला ४१-२० असे लोळवले

Next

पुणे : अत्यंत एकतर्फी झालेल्या सामन्यात यू मुम्बाने प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या इंटर झोन सामन्यात बलाढ्य तेलगू टायटन्सला ४१-२० असे लोळवले. यू मुम्बाच्या एकट्या सिद्धार्थ देसाईने तब्बल १७ गुणांची वसूली करत दोन संघातील फरक स्पष्ट केला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केलेल्या मुंबईकरांचा हल्ला थोपवणे टायटन्सला भारी पडले. आक्रमणासह बचावामध्येही जबरदस्त कामगिरी करताना मुंबईकरांनी टायटन्सच्या आव्हानातली हवाच काढली.
मध्यंतराला १७-१२ अशी आघाडी घेतल्यानंतर मुंबईकरांनी जबरदस्त आक्रमक खेळ करताना टायटन्सला संधीच दिली नाही. सिद्धार्थ देसाईने १९ वेळा चढाई करताना त्यातून १७ गुण मिळवत टायटन्सला दबावाखाली आणले. सिद्धार्थ चढाईत गुण मिळवत असताना कर्णधार फझल अत्राचली, अबोलफझल मघसोद्लौ, सुरेंदर सिंग व विनोद कुमार यांनी भक्कम पकडी करत टायटन्सची हवा काढली.
तेलगू टायटन्सकडून कर्णधार राहुल चौधरी याने एकाकी झुंज दिली त्याने आक्रमणात ७ गुणांची कमाई केली. मात्र इतर खेळाडू चढाईमध्ये अपयशी ठरले. त्याचप्रमाणे त्यांच्या पकडीही कमजोर ठरल्याने मुंबईकरांनी गुणांची लयलूट करताना सहज बाजी मारली. मध्यंतरानंतर जबरदस्त आक्रमक खेळ केलेल्या मुंबईकरांनी टायटन्सवर सामन्यात एकूण तीन लोन चढवत वर्चस्व राखले.
अन्य लढतीत तामिळ थलाइवास संघाने शानदार विजय मिळवताना पुणेरी पलटनचा ३६-३१ असा पराभव केला. मध्यंतराला तामिळ संघाकडे १६-१५ अशी नाममात्र आघाडी होती. पुण्याने त्यांना कडवी झुंज दिली, मात्र अंतिम क्षणी झालेल्या चुकांमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Web Title: Yu Munda rolled the Telugu Titans to 41-20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.