शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : एअर इंडिया, राजमाता जिजाऊ विजेते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 18:25 IST

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात एअर इंडिया, मुंबई तर महिला गटात राजमाता जिजाऊ, पुणे  या संघांनी विजेतेपद पटकावले.

ठाणे -  ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात एअर इंडिया, मुंबई तर महिला गटात राजमाता जिजाऊ, पुणे  या संघांनी विजेतेपद पटकावले.  ही स्पर्धा ठाणे महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन  यांच्या संयुक्त विदयामाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये पुरुष व्यावसायायिक18 संघ व महिलाचे 18 संघ सहभागी झाले होते.स्पर्धेच्या अंतिम दिवशी व्यावसायिक पुरुष गटाच्या अंतिम लढतीत एअर इंडिया-मुंबई आणि युनियन बँक-मुंबई आमनेसामने होते. यात एअर इंडिया-मुंबईने 37 गुणांनी एकतर्फी विजय संपादित करत विजेतेपदावर कब्जा केला. एअर इंडियाकडून सिध्दार्थ देसाई, मोनू यांनी   उत्कृष्ट चढाईचे प्रदर्शन केले. तर उमेश म्हात्रे, विकास काळे यांनी भक्कम बचाव करताना उत्तम पकडी केल्या.तर महिला गटामध्ये पुण्याचा राजमाता जिजाऊ संघ आणि शिवशक्ती-मुंबई शहर या संघांमध्ये अंतिम लढत रंगली.  या सामान्यात राजमाता जिजाऊ-पुणे संघाने 12 गुणांनी विजय मिळवला. अटीतटीच्या झालेल्या अंतिम लढतीत शिवशक्ती-मुंबई यांनी चांगल्या प्रकारे लढत दिली. मात्र राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या राजमाता जिजाऊ पुणे संघातील सायली किरपाळे, सलोनी गजमल यांनी उत्तम चढाई केली. तर पकडीची साथ मानसी सावंत व पुनम साठे यांनी दिल्याने राजमाता जिजाऊ-पुणे संघाने विजय खेचून आणला.  महापौर सौ.मिनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा परबवाडी येथील  शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरी, येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या अंतिम दिवशी  मा एकनाथ शिंदे, मंत्री, सार्वजनिक बांधकाम (बांधकाम उपक्रम) महाराष्ट्र राज्य, मुंबई तथा पालकमंत्री-ठाणे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रविंद्र फाटक-विधान परिषद, मा.महापौर मिनाक्षी शिंदे, सभागृह नेते व स्थानिक नगरसेवक नरेश म्हस्के, विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.   

टॅग्स :Kabaddiकबड्डीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाSportsक्रीडा