शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

कबड्डी : संघर्ष, होतकरू, अमरहिंद, शिवशक्ती यांची विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 21:05 IST

शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

ठळक मुद्देठाण्याच्या होतकरूने क गटात मुंबई पोलिसांना २४-२३असे चकवित आगेकूच केलीपुरुषांच्या इ गटात उपनगरच्या जॉलीने कोल्हापूरच्या नवभारतला ३१-३०असे चकविलेउपनगरच्या संघर्षने अ गटात नाशिकच्या एस पी. चा ४६-२१असा धुव्वा उडविला.

मुंबई : मुंबईतील ना म जोशी मार्ग येथील श्रमिख जिमखाना येथे आज पासून सुरू झालेल्या शिवाई प्रतिष्ठान राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिलांच्या उदघाटनीय कबड्डी सामन्यात उपनगरच्या संघर्षने अ गटात नाशिकच्या एस पी. चा ४६-२१असा धुव्वा उडविला. पहिल्या डावात २१-०९अशी आघाडी घेणाऱ्या संघर्षने दुसऱ्या डावातही तोच जोश कायम राखत हा सामना सहज आपल्या नावे केला. कोमल देवकर, कोमल यादव यांच्या चढाया, तर  पूजा जाधव, अश्विनी पाटेकर यांचा भक्कम बचाव या विजयात महत्वाचा ठरला. योगिता धोत्रे, अपेक्षा मोहिते नाशिककडून छान खेळल्या. या सामन्यात चमकदार विजय मिळविणाऱ्या संघर्षाला पुढच्या सामन्यात मात्र पराभवाची चव चाखावी लागली. मुंबईच्या शिवशक्तीने त्यांना ३३-२६ असे नमविलें.मध्यांतराला २३-१०अशी आघाडी घेणाऱ्या शिवशक्तीने नंतर मात्र सावध खेळ करीत हा विजय साकारला. अपेक्षा टाकळे, पूजा यादव, रेखा सावंत, पौर्णिमा जेधे यांच्या पल्लेदार चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. कोमल देवकर, दीपा बर्डे यांना उत्तरार्धात सूर सापडला, पण तोपर्यंत सामना हातातून निसटला होता.

       ठाण्याच्या होतकरूने क गटात मुंबई पोलिसांना २४-२३असे चकवित आगेकूच केली. मध्यांतराला १०-१३ अशा पिछाडीवर पडलेल्या  होतकरूने चैताली बोऱ्हाडे, प्राजक्ता पुजारी, राजश्री ढेले यांच्या जोशपूर्ण खेळाने हा विजय खेचून आणला. पोलिसांच्या सोनल धुमाळ, शीतल बावडेकर यांना उत्तरार्धात सहकाऱ्यांनी योग्य ती साथ न दिल्याने हा निसटता पराभव पत्करावा लागला. ब गटात महात्मा गांधीने डॉ. शिरोडकरला ५०-१७असे धुवून काढले. पूजा केणी, शीतल जाधव, तेजस्वी पाटेकर, रुपाली जाधव या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. एकेकाळचा हा बलाढ्य संघ आज मात्र अगदीच दुबळा वाटला. शिरोडकरची मेघा कदम एकाकी लढली. ड गटात अमरहिंदने उपनगरच्या नवशक्तीला ३३-२६असे नमविलें. श्रद्धा कदम, तेजश्री सारंग, सुप्रिया म्हस्के अमरहिंद कडून, तर बेबी जाधव, पूर्वा सपकाळ नवशक्ती कडून उत्कृष्ट खेळल्या.

     पुरुषांच्या इ गटात उपनगरच्या जॉलीने कोल्हापूरच्या नवभारतला ३१-३०असे चकविले. मध्यांतराला जॉली संघ ०६-२३असा १७गुणांनी पिछाडीवर होता. उत्तरार्धात जॉलीच्या नामदेव इस्वालकर, विशाल राऊत,सचिन तांबे यांनी झंजावाती खेळ करीत या विजय साकारला. योगेश व आशिष या पाटील बंधूंचा पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात टिकला नाही. त्यामुळे नवभारत संघ पराभवाच्या खाईत लोटला गेला. ड गटात कोल्हापूरच्या शाहू सडोलीने पालघरच्या श्रीराम संघाला २९-२३असे पराभूत केले. याच गटात अंकुरने देखील श्रीरामला ३६-२६असे पराभूत केल्यामुळे पालघरकरांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. अंकुरच्या या विजयाचे श्रेय सुशांत साईल, अजय देवाडे, अक्षय मिराशी व किसन बोटे यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला जाते. पालघरकरांचा दोन्ही सामन्यात उत्तरार्धात खेळ बहरला,परंतु सुरवात मात्र अडखळत झाली. त्यामुळे ते पराभवाचे धनी झाले. क गटात गोलफादेवीने पुण्याच्या सतेज - बाणेरला ३५-२५असे नमविलें. विराज उतेकर, सिद्धेश पिंगळे, अनिकेत जावरे यांना या विजयाचे श्रेय जाते. 

इतर निकाल - पुरुष १) फ गट अमर वि वि शिवशक्ती (२९-२८);  २) अ गट विजय बजरंग वि वि विजय क्लब (२३-१९); ३)जय भारत वि वि गुड मॉर्निग (४१-२८). या स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार सचिनभाऊ अहिर, माजी महापौर स्नेहल आंबेकर, विद्यमान उपमहापौर हेमांगी वरळीकर, सदानंद शेटे (अर्जुन पुरस्कार प्राप्त) यांच्या उपस्थितीत पार पडला.

टॅग्स :Kabaddiकबड्डीMumbaiमुंबई