शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

भारतीय संघाचा डबल धमाका, पुरुष व महिला संघांनी पटकावले सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 20:54 IST

भारताने आंतरराष्ट्रीय कबड्डीमधील आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध करताना आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष व महिला गटात सुवर्ण पदकाची कमाई करत ‘डबल धमाका’ केला.

गोरगान (इराण) : भारताने आंतरराष्ट्रीय कबड्डीमधील आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध करताना आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष व महिला गटात सुवर्ण पदकाची कमाई करत ‘डबल धमाका’ केला. भारतीय पुरुषांनी अंतिम लढतीत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ३६-२२ असे नमवले. दुसरीकडे, महिलांनी अपेक्षित सुवर्ण पटकावताना कोरियाचा ४२-२० असा फडशा पाडला.इराण येथील गोरगान शहरात संपन्न झालेल्या या स्पर्धेत भारतीय पुरुषांनी साखळी फेरीतही पाकिस्तानचा ४४-१८ असा धुव्वा उडवला होता. साखळी फेरीच्या तुलनेत अंतिम सामन्यात पाकिस्तानने चांगली लढत दिली. परंतु, कसलेल्या भारतीयांपुढे त्यांचा निभाव लागला नाही. मध्यंतरालाच भारताने २५-१० अशी एकतर्फी आघाडी घेत आपले सुवर्ण निश्चित केले होती. दुसºया सत्रामध्ये पाकिस्तानने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करताना थोडीफार झुंज दिली. यावेळी त्यांनी १२ गुण कमावताना भारताला केवळ एका गुणाने मागे टाकल होते. परंतु, पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर भारताने वर्चस्व कायम राखले. प्रदीप नरवालसह, सुरेंदर नाडा, मनिंदर सिंग, अजय ठाकूर आणि संदीप नरवाल यांनी भारताच्या जेतपदामध्ये मोलाचे योगदान दिले. दरम्यान, उपांत्य फेरीत बलाढ्य इराणला धक्कादायकरीत्या २८-२४ असे नमविलेल्या पाकिस्तानकडून भारताला कडवी झुंज मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, भारताने आपल्या अनुभवाच्या जोरावर पुन्हा एकदा पाक खेळाडूंना कबड्डीचे धडे दिले.दुसरीकडे, महिलांनीही आपले आंतरराष्ट्रीय स्तरावरील वर्चस्व कायम राखले. मुंबईची अभिलाषा म्हात्रे हिच्या नेतृत्त्वाखाली खेळताना भारताच्या महिलांनी कोरियाचा ४२-२० असा २२ गुणांची दणदणीत पराभव करत दिमाखात बाजी मारली. मध्यंतराला १९-१२ अशी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाने कमालीचे आक्रमण करताना कोरियाचे मानसिक खच्चीकरण केले. आक्रमणासह बचावामध्येही दमदार कामगिरी करताना भारताने कोरियाला रौप्य पदकावार समाधान मानण्यास भाग पाडले.