शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Asian Games 2018: भारत-इराण कबड्डीच्या सुवर्णपदकासाठी भिडणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 15:32 IST

Asian Games 2018:  भारत आणि इराण यांच्यातील कबड्डी सामन्याची चुरस पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.

जकार्ता -  भारत आणि इराण यांच्यातील कबड्डी सामन्याची चुरस पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. आशियाई स्पर्धेतील महिला कबड्डी संघाच्या अंतिम फेरीत हे दोन बलाढ्य प्रतिस्पर्धी समोरासमोर येणार आहेत. गुरूवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारतीय महिलांनी चायनीज तैपेइचा 27-14 असा सहज पराभव केला, तर इराणने थायलंडचा 23-16 असा पराभव केला.

भारत आणि इराण यांच्यात 2014ची अंतिम फेरीचा सामना झाला होता आणि त्यात भारताने 31-21 अशा फरकाने विजय साजरा केला होता. आशियाई स्पर्धेतील सलग तिसरे जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीय महिला संघाला यंदा इराण कडवी झुंज देण्यासाठी सज्ज आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेत एकही पराभव पत्करलेला नाही. त्यामुळे जेतेपदासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करतील हे निश्चित. 

भारतीय महिलांनी 2010 आणि 2014 च्या आशियाई स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. 2010 मध्ये भारताने थायलंडला नमवले होते, तर इराणला बांगलादेशसह संयुक्तपणे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र त्यांनी आपल्या कामगिरीचा स्तर उंचावलेला आहे आणि त्यांनी 2014 मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे आठ वर्षांचा आढावा घेतल्यास इराणची कामगिरी बरीच सुधारली आहे. त्यामुळे सुवर्णपदकाची हॅटट्रिक साधणे भारतासाठी इतकी सोपी गोष्ट नसेल. 

टॅग्स :Kabaddiकबड्डीAsian Games 2018आशियाई स्पर्धाSportsक्रीडा