शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पिझ्झा २८७ रुपयांचा पण झोमॅटोला पडला १० हजाराला! जाणून घ्या काय नेमकं प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 17:22 IST

चंदीगड राज्य ग्राहक विवाद निवारण कक्षाने झोमॅटो या फुड डिलिव्हरी कंपनीला अजय शर्मा या ग्राहकाला १० हजार रुपयांचा भुर्दंड आणि एक जेवण ३० दिवसांच्या आत मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. हे नेमकं प्रकरण तरी काय आहे? जाणून घेऊया

ऑन टाईम फुड डिलिव्हरीचं वचन देणाऱ्या झोमॅटोला आता चांगलाच दणका मिळाला आहे. २८७ रुपयांचा पिझ्झा त्यांना १० हजार रुपयाला पडला आहे. चंदीगड राज्य ग्राहक विवाद निवारण कक्षाने झोमॅटो या फुड डिलिव्हरी कंपनीला अजय शर्मा या ग्राहकाला १० हजार रुपयांचा भुर्दंड आणि एक जेवण ३० दिवसांच्या आत मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. हे नेमकं प्रकरण तरी काय आहे? जाणून घेऊया

नेमकं प्रकरण काय?अजय शर्मा यांनी झोमॅटो या फुड डिलिव्हरी अ‍ॅपवर २०२०मध्ये रात्री १०.१५ च्या दरम्यान पिझ्झाची ऑर्डर दिली. या पिझ्झाची किंमत २८७ रुपये होती. यावेळी वेळेत डिलिव्हरी करण्याचे १० रुपये अधिक लावण्यात आले. जवळजवळ १५ मिनिटांनी त्यांना ही ऑर्डर कॅन्सल झाल्याचा अन् त्याचे रिफंड मिळणार असल्याचा मेसेज आला.

त्यानंतर याबाबत शर्मा यांनी दिल्लीच्या ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्तांकडे तक्रार केली. पण त्यांची ही तक्रार रद्द करण्यात आली. त्यानंतर शर्मा यांनी चंदीगड राज्य ग्राहक विवाद निवारण कक्षाकडे तक्रार दिली. या कक्षाने झोमॅटो या कंपनीला आता शर्मा यांना १० हजार रुपयांचा भुर्दंड आणि एक जेवण मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच झोमॅटोचं 'कभी तो लेट हो जाता' हे प्रमोशनल स्लोगन काढुन टाकायला सांगितलेलं आहे. 

शर्मा यांनी इंडिया टुडेकडे याविषयी मत व्यक्त करताना म्हटलं की, '' वेळेत डिलिव्हरी करण्याचं वचन देऊन त्याचे १० रुपये अधिक आकारुन स्वत: हुनच ऑर्डर रद्द करणे हे अत्यंत अव्यावसायिक आहे.'' 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके