शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मस्करीची कुस्करी! बिस्कीटातील क्रिम काढून लावलं टूथपेस्ट, १५ महिने तुरूंगवासाची शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 12:27 IST

एखाद्याची गंमत करणं कसं महागात पडू शकतं याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.

(Image Credit : YouTube)

एखाद्याची खोड करण्याची किंवा गंमत करण्याची सवय अनेकांना असू शकते. कुणाची काही खोड केली तर घरातील मोठे लोक फार फार तर रागावतील आणि विसरतील. पण एका व्यक्तीला खोड काढणं इतकं महागात पडलं की, तुमचा विश्वास बसणार नाही. एका तरूणाने ओरिओ बिस्कीटातील क्रिम काढून त्यावर टूथपेस्ट लावलं. हे बिस्किट त्याने एका बेघर व्यक्तीला खाण्यासाठी दिलं. ज्याने हे केलं त्या तरूणाला यावरून १५ महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा झाली आहे. 

ही घटना स्पेनमधील असून इथे Kanghua Ren नावाचा एक यूट्यूबर आहे. त्याने एका ५२ वर्षीय रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तीला टूथपेस्ट लावलेले बिस्कीट दिले. त्याने ते खाल्ले सुद्धा. पण नंतर त्याला उलटी झाली. ती व्यक्ती लगेच पोलिसांकडे गेली आणि त्याने तरूणाची तक्रार केली. त्याने पोलिसांना सांगितले की, रस्त्यावर राहत असताना आजपर्यंत कुणीही त्याच्यासोबत अशी गंमत केली नाही. 

झाली १५ महिन्यांची शिक्षा

'द न्यूयॉर्क टाइम्स' नुसार, रेन याला एका व्यक्तीचा सन्मान दुखावल्याप्रकरणी १५ महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्पॅनिश कायद्यानुसार, पहिल्यांदा अहिंसक अपराध करणाऱ्या आरोपीला कमीत कमी दोन वर्षांची शिक्षा दिली जाते. त्यानुसारच रेन याला १५ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

मस्करीची कुस्करी

रेन याने त्याचा बचाव करताना सांगितले की, 'हा व्हिडीओ केवळ एक गंमत म्हणून केला होता. नक्कीच ही गंमत बेकार होती. मी लोकांना हसवण्याचं काम करतो.  लोकांना असे व्हिडीओज आवडतात'. रेनला २० हजार यूरो दंडही भरावा लागला. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल