शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
3
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
4
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
5
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
6
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
7
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
8
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
9
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
10
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
11
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
12
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
13
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
14
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
15
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
16
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
17
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
18
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
19
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
20
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

गेम खेळताना अचानक बंद पडले युवकाच्या ह्दयाचे ठोके; २० मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 20:09 IST

ही घटना पाहताच उपस्थित कर्मचारी त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहचले त्याठिकाणी डॉक्टरांनी युवकाला मृत घोषित केले.

ठळक मुद्देत्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी एक शर्थीचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतलासर्वात पहिलं त्या युवकाला २० मिनिटं कार्डियोपल्मोनरी रिसिसिटेशन देण्यात आलं.हा युवक गेम खेळता खेळता अचानक पल्मोनरी एम्बोलिज्म अवस्थेत गेला होता.

ऑनलाईन गेममुळे रोज काही ना काही अपघात अथवा भयानक किस्से घडत असल्याच्या बातम्या समोर येतात. परंतु चीनच्या हेनान प्रांतात एक अजब-गजब घटना घडली आहे. याठिकाणी जे घडलं त्यावर विश्वास ठेवणंही तुम्हाला कठीण जाईल. संपूर्ण रात्र जागून एक मुलगा गेम खेळत होता त्यानंतर तो मृत झाल्याचं आढळलं. परंतु त्यानंतर जे घडलं त्याने सगळ्यांनाच धक्का बसला.

तोंडातून फेस आला अन् बेशुद्ध झाला

ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार २० वर्षाचा युवक झेंग्झो इंटरनेट बारमध्ये बेशुद्ध झाला. बारच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, रात्रभर गेम खेळत राहिल्याने तो खुर्चीतून उठूच शकला नाही. त्याच्या तोंडातून अचानक फेस आला आणि तो बेशुद्ध पडला. त्यानंतर हा युवक जमिनीवर कोसळला. ही घटना पाहताच उपस्थित कर्मचारी त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहचले त्याठिकाणी डॉक्टरांनी युवकाला मृत घोषित केले. डॉक्टरांनी तपासले असता युवकाच्या ह्दयाचे ठोके बंद पडले होते आणि श्वासही थांबला होता. मात्र त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी एक शर्थीचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. कारण मुलगा बेशुद्ध होऊन थोडाच वेळ झाला होता.

डॉक्टरांनी असा वाचवला जीव

डॉक्टरांनी तातडीने त्या युवकावर उपचार सुरू केले. सर्वात पहिलं त्या युवकाला २० मिनिटं कार्डियोपल्मोनरी रिसिसिटेशन देण्यात आलं. त्यानंतर त्याचा जीव वाचवण्यासाठी एपिनेफ्रिन औषध दिलं. ज्यानंतर त्याचे ह्दयाचे ठोके पुन्हा सुरू झाले. डॉक्टरांनी तात्काळ आपत्कालीन उपचारासाठी  दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवण्याचा निर्णय घेतला. या युवकावर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आता सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

काय झालं होतं?

डॉक्टरांनी सांगितले होते की, हा युवक गेम खेळता खेळता अचानक पल्मोनरी एम्बोलिज्म अवस्थेत गेला होता. त्यामुळे त्याचे ह्दयाचे ठोके बंद झाले होते. या स्थितीत क्लॉटिंगमुळे रक्त फुफ्फुसांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. पल्मोनरी एम्बोलिज्म लक्षणांमध्ये अचानक श्वास घेण्यास त्रास होणे, ह्दयाचे ठोके अनियमित होणे. दिर्घश्वास घेतेवेळी किंवा खोकल्याने छातीत दुखणे. खोकल्यासोबत रक्त येणे. सूज येणे, अंगात घाम येणे. शरीर थंड पडणे यासारखी लक्षणं आहेत.

 

टॅग्स :chinaचीनdoctorडॉक्टर