शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'तिच्या'साठी काय पण! भाच्याचं आत्यावरच प्रेम जडलं, 18 वर्ष पूर्ण होताच दोघांनी लग्न केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 15:15 IST

The young man fell in love with his aunt : भाच्याचं आपल्या आत्यावरच प्रेम जडलं आणि 18 वर्ष पूर्ण होताच दोघांनी लग्न केल्याची घटना घडली आहे.

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. बिहारच्या चंपारणमध्ये ही अजब घटना घडली आहे. भाच्याचं आपल्या आत्यावरच प्रेम जडलं आणि 18 वर्ष पूर्ण होताच दोघांनी लग्न केल्याची घटना घडली आहे. घराच्यांचा विरोध असल्याने पळून जाऊन त्यांनी शिव मंदिरात लग्न केलं आहे. ही घटना उघड झाल्यावर सर्वांनाच धक्का बसला असून नातेवाईक हैराण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नात्याने आत्या असणाऱ्या मुलीसोबत मुलाचं प्रेम प्रकरण असल्याने कुटुंबीयांनी त्यांना क़डाडून विरोध केला होता. 

आत्या आणि भाचा या दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम होतं, की वयाची 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांनी वाट पाहिली, जेणेकरुन ते लग्न करू शकतील. त्यानंतर कुटुंबाच्या विरोधात जाऊन ते दोघेही पळून गेले. दोघांनी एका मंदिरात लग्न केलं. आत्या असणाऱ्या त्या नवरीचं वय 18 वर्ष असून भाच्याचं म्हणजेच नवरदेवाचं वय 19 वर्ष आहे. सहा वर्षांपूर्वी आदित्य पटेल आपल्या मामाकडे एका लग्नासाठी आला होता. त्यावेळी त्याचं नात्याने आत्या असणाऱ्या आंचल पटेलवर प्रेम जडलं. दोघांचं ही एकमेकांवर प्रेम होतं. अनेक वर्षांपासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. 

मुलगी नात्याने मुलाची आत्या लागत असल्याने मुलाच्या कुटुंबाचा दोघांच्या लग्नाला विरोध होता. मुलीने कुटुंबीय तिला मारहाण करत असल्याचं सांगितलं. परंतु जसं मुलीने वयाची 18 वर्ष पूर्ण केली. त्यानंतर तीन दिवसांनी तिने घरातून पळून जाऊन प्रियकराशी लग्न केलं. मुलगी घरात नसल्याने तिची शोधाशोध झाली. तिचे कुटुंबिय थेट मुलाच्या घरी पोहोचले. त्यावेळी या दोघांनी लग्न केल्याचं समजलं. शेवटी दोघांच्या हट्टापुढे कुटुंबीय देखील झुकले. या लग्नाची सर्वत्र सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :marriageलग्नBiharबिहार