शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कार करण्यापूर्वी जिवंत झाला तरुण; म्हणाला, यमदुतांनी चुकून नेले होते प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 16:26 IST

माणसाचा अंतकाल जवळ आल्यावर त्याचे प्राण नेण्यासाठी दोन यमदूत येतात, असे शास्त्र सांगते. पण या यमदूतांनी कधी कुणाचे चुकून प्राण नेल्याचे तुम्ही ऐकलेय का?

ठळक मुद्देपंजाबमधील एका गावामध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहेपंजाबमधील बरनालाजवळील पक्खोकला गावातील एका तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केले होतेमात्र अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच हा तरुण उठून बसला

चंदिगड -  माणसाचा अंतकाल जवळ आल्यावर त्याचे प्राण नेण्यासाठी दोन यमदूत येतात, असे शास्त्र सांगते. पण या यमदूतांनी कधी कुणाचे चुकून प्राण नेल्याचे तुम्ही ऐकलेय का? पण पंजाबमधील एका गावामध्ये असा धक्कादायक प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.  येथील एका तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. दु:खद प्रसंगी त्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कारांची तयारी सुरू केली. मात्र अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच हा तरुण उठून बसला.  दरम्यान, यमदूतांनी चुकून आपले प्राण नेल्याचा दावा या तरुणाने केला आहे. हा प्रकार पंजाबमधील बरनालाजवळील पक्खोकला गावात घडला आहे. येथील सिंगारा सिंह यांचा मुलगा गुरतेज सिंह याला अंधूक दिसू लागल्याने रुग्णालयात दाखल केले होते.  अधिक उपचारांसाठी त्याला चंदिगडमधील पीजीआय येथे दाखल करण्यात आले. तेथे 11 जानेवारी रोजी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मात्र त्याचे डेथ सर्टिफिकेट त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आले नाही. कुटुंबीयांनी गुरतेग याच्या अंत्यसंस्काराची तयारी केली.  अंत्यसंस्कारासाठी त्याचे कपडे बदलत असताना शेजाऱ्यांना त्याचे श्वसन सुरू असल्याचे जाणवले. त्यामुळे शेजारच्या केमिस्ट शॉपमध्ये काम करणाऱ्याला बोलावले गेले. त्याने गुरतेजचा श्वासोश्वास सुरू असल्याचे सांगितले. त्यादरम्यान गुरतेग उठून बसला. त्यानंतर त्याचे कुटुंबीय त्याला सिव्हील रुग्णालयात घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी गुरुतेज याला फरीदकोट येथील बाबा फरीद मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, या प्रकारामुळे गुरतेजच्या कुटुंबीयांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याबाबत उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूPunjabपंजाब