(Image Credit : theceomagazine.com)
वाघाला बघण्यासाठी लोक देशातील वेगवेगळ्या जंगलांमध्ये फिरायला जातात. यात काहींना वाघाचं दर्शन होतं तर काहींना तसंच परत यावं लागतं. पण वाघ बघण्याची क्रेझ मात्र काही कमी होत नाही. वाघ कितीही घातक प्राणी असला तरी त्याच्याविषयीची ओढ सगळ्यांनाच असते. त्याचं सौंदर्य अनेकांना भुरळ घालतं. पण जवळून काही कुणाला वाघ बघता येत नाही. पण एक असं हॉटेल आहे जिथे तुम्ही वाघासोबत झोपू शकता.
आता तुम्ही म्हणाल की, वाघासोबत झोपण्याची संधी कशी काय? तर नायाब नावाचं एक हॉटेल Port Lympne Hotel and Reserve यूकेमध्ये तयार करण्यात आलं आहे. आश्चर्याची बाब ही आहे की, ज्या वाघाच्या नावाने अनेकांच्या अंगावर शहारे येतात किंवा मनात भीती निर्माण होते, त्या वाघासोबत तुम्हाला वेळ घालवायला मिळतो. आणि यासाठी तुम्हाला १ लाख ६० हजार रूपये मोजावे लागतात. ही रक्कम या हॉटेलमध्ये केवळ एक रात्र थांबण्याची आहे.
आता वाघाला बघण्यासाठी काही लोक इतके पैसे देऊ शकतात आणि ते देत आहेत. हॉटेलने याबाबत विस्ताराने लिहिले आहे की, हे जगातलं पहिलं Lion Lodges आहे. मास्टर बेडरूम आणि ओपन प्लॅन एरियासोबतच गेस्ट हाऊस आणि वाघात केवळ केवळ एका श्वासाचं अंतर असेल.
तसं तर ज्या लोकांना सिंह पसंत नाही त्यांच्यासाठी इथे Tiger Lodge आणि Wolf Lodge. पण हे सगळं रोमांचक कमी आणि भयानक जास्त वाटत आहे. पण ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत ते यांसारख्या गोष्टी करू शकतात. पण जगात अशाही गोष्टी घडत आहेत हे सांगण्याचा हा प्रयत्न.