शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

७ हजार लक्झरी कार्स, महालात हिरे, सोन्याचं नक्षीकाम; पाहा कशी आहे सुलतानाची लाईफस्टाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 20:57 IST

जगातील सर्वात श्रीमंत सुलतानांपैकी एक असलेल्या सुलतानाकडे ७ हजारांपेक्षा अधिक कार्स आहेत. केवळ त्या कार्सचीच किंत ३४१० कोटी रुपये आहे.

जगातील एकापेक्षा एक श्रीमंत लोकांबाबत आपण ऐकलं असेल. असाच एक सुलतान आहे, ज्याच्याकडे जवळपास ७ हजार लक्झरी कार्स आहेत. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये रोल्स रॉयस (Rolls Royce), मर्सिडीज (Mercedes), फरारी (Ferrari), बेंटले (Bentley) यासह अनेक लक्झरी वाहनांचा समावेश आहे. इतकंच नाही तर त्यांच्याकडे एवढी संपत्ती आहे की बसण्यासाठीही सोन्याच्या सिंहासनाचा वापर केला जातो. इतकंच नाही, तर त्यांची गाडीदेखील सोन्यानं मढलेली असते. तर मग जाणून घेऊया कोण आहे या ७ हजार कार्सचा मालक.

७ हजार कार्ससह अमाप संपत्तीच्या मालकाचे नाव हसनल बोलकिया (Hassanal Bolkiah) असे आहे. ते ब्रुनईचा (बोर्निओ बेटावरील एक छोटासा देश) विद्यमान सुलतान आणि पंतप्रधान आहेत. जगातील श्रीमंत राज्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते. हसनल बोलकिया यांनी ब्रुनेईवर राज्य केल्यापासून ५० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. १९८० पर्यंत हसनल हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. काही काळापूर्वीच त्यांनी आपल्या शासन काळाची ५० वर्षे साजरी केली. यामध्ये हजारो लोक सामील झाले होते. त्यांचं कुटुंब ब्रुनेईवर ६०० वर्षांपासून राज्य करत असल्याचं सांगितलं जातं. जेव्हा हसनल २१ वर्षांचे होते, तेव्हाच १९६७ मध्ये त्यांच्या हाती देशाचा कारभार आला.

कार कलेक्शन आणि प्लेनअनेक रिपोर्ट्सनुसार त्यांच्या कार कलेक्शनमध्ये ७ हजार कार्स आहेत. यामध्ये ६०० पेक्षा अधिक रोल्स रॉयस, ५७० पेक्षा अधिक मर्सिडीज बेंझ आणि अन्य लक्झरी कार्स आहेत. त्यांच्याकडे एक अशीही कार आहे, जी पूर्णपणे सोन्यानं मढवलेली आहे. अनेकगा ती कार रस्त्यांवरही दिसून येते.  विमानातही लिविंग रुम, बेडरुमएका रिपोर्टनुसार हसनल बोलकिया यांच्याकडे लक्झरी सुविधा असलेली प्रायव्हेट जेट बोईंग ७४७-४००, बोईंग ७६७-२०० आणि एअरबस ए३२०-२०० आहे. परंतु त्यांचं एक जेट सोन्यानं सजवलेलं आहे. यामधअये लिविंग रुम, बेडरुमसह अन्य सुविधाही आहेत. रिपोर्टनुसार त्यांच्याकडे १४ हजार ७०० कोटींपेक्षा अधिकची संपत्ती आहे. कच्चा तेलाचा साठा आणि नैसर्गिक गॅस हे त्यांच्या कमाईचं प्रमुख साधन आहे. त्यांच्या पॅलेसलाही त्यांनी 'इस्ताना नुरुल इमान पॅलेस' असं नाव दिलं आहे. याची किंमत २२५० कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं.

त्यांचा हा पॅलेस १९८४ मध्ये तयार करण्यात आला असून तो २ हजार चौरस फुटांमध्ये पसरलेला आहे. यामध्ये २२ कॅरेट सोन्याचाही वापर करण्यात आला आहे. यात १७०० पेक्षा अधिक खोल्या, २५७ बाथरुम, पाच स्विमिंग पूल, ११० गॅरेज आणि २०० घोड्यांसाठी एसी जागाही आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल