शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कधीकाळी महागड्या कारमध्ये फिरत होती, पतीने घटस्फोट दिला अन् आता करावी लागत आहे ड्रायव्हरची नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 12:26 IST

आपल्या आयुष्यात झालेल्या या बदलानंतर नन्नेट्टेला जगातील सगळ्यात हॉट ड्राव्हयरचा टॅग मिळाला आहे. ती पतीपासून घटस्फोट घेतल्यावर आता उबर चालवत आहे.

असं म्हणतात की, नशीब खराब असेल तर भलेभले लोक महालातून रस्त्यावर येतात. ज्या व्यक्तीने लग्नानंतर कधी जमिनीवर पाय ठेवला नव्हता, आता ती व्यक्ती पतीने घटस्फोट दिल्यानंतर रस्त्यावर कॅब चालवते. आम्ही तुम्हाला सांगतोय कधीकाळी प्लेबॉयसारख्या मॅगझीनच्या मॉडलबाबत. मॉडलिंग करत असताना ननेट्टेने एका श्रीमंत व्यक्तीसोबत लग्न केलं आणि मग तिला कधीच काम करण्याची गरज पडली नाही. प्लास्टिक सर्जरीसाठी तिने कोट्यावधी रूपये खर्च केले होते. पण आता तिला ड्रायव्हरची नोकरी करावी लागत आहे.

आपल्या आयुष्यात झालेल्या या बदलानंतर नन्नेट्टेला जगातील सगळ्यात हॉट ड्राव्हयरचा टॅग मिळाला आहे. ती पतीपासून घटस्फोट घेतल्यावर आता उबर चालवत आहे. तिने प्लास्टिक सर्जरीवर साडे तीन कोटी रूपये खर्च केले होते. पण आता घटस्फोट झाल्यावर तिच्याकडे काहीच राहिलं नाही. तिने कोर्टात केस केली होती जी ती हरली. आता फार गरीबीत ती दिवस काढत आहे. आपला खर्च चालवण्यासाठी ती आता ड्रायव्हरची नोकरी करत आहे.

नन्नेट्टेने सांगितलं की, जेव्हाही ती कार घेऊन कुणाला पिक करायला जाते तेव्हा तिला पाहून सगळे हैराण होतात. अनेक लोक तर तिला प्लास्टिकची बाहुली समजतात. या करिअरमध्ये आल्यावर तिला जगातली सगळ्यात हॉट उबर ड्रायव्हरचा टॅग मिळाला आहे. पण लोक इतक्या हॉट ड्रायव्हरला पाहून हैराण होतात. अनेक लोक तिच्या कारमध्ये बसतच नाहीत. जेव्हा ती लायसेन्स दाखवते तेव्हा ते बसतात.

घटस्फोटाआधी नन्नेट्टेचं आयुष्य शाही होतं. ती रोज वेगवेगळ्या कारमध्ये फिरत होती. तिचा एक बंगला होता. पण आता ती भाड्याच्या घरात राहते. जिथे तिला बेडही नाहीये. ती खाली एका गादीवर झोपते. खाण्यापिण्यासाठीही फार कमी पैसे वाचत नव्हते. तेव्हा तिने कॅब चालवण्याचा विचार केला. उबरसोबत टायअप केल्यावर तिला टेस्ला मिळाली. जी चालवणं तिला फार आवडतं. नन्नेट्टे म्हणाली की, घटस्फोटानंतर तिच्या पतीने तिच्याकडून सगळ्या कार घेतल्या. त्यानंतर तिने ड्रायव्हर बनण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय