शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जर्मनीवर टाकला होता बॉम्ब, ७० वर्षांनी फुटला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 12:39 IST

जर्मनीच्या फ्रॅंकफर्ट शहरात रविवारी माइन नदीमध्ये दुसऱ्या महायुद्धातील एक बॉम्ब आढळला. रिपोर्टनुसार, हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकन विमानाने पाडला होता.

जर्मनीच्या फ्रॅंकफर्ट शहरात रविवारी माइन नदीमध्ये दुसऱ्या महायुद्धातील एक बॉम्ब आढळला. रिपोर्टनुसार, हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकन विमानाने पाडला होता. इतक्या वर्षांनंतरही हा बॉम्ब जिवंत होता. त्यामुळे बॉम्ब शोधक पथकाने नियंत्रित विस्फोटाच्या माध्यमातून हा बॉम्ब फोडून निष्क्रिय केला. हा धमाका इतका जोरदार होता की, नदीतील पाणी ३० मीटर उंच उडालं होतं. हा जोरदार धमाका करण्याआधी आजूबाजूच्या ६०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. असे सांगितले जात आहे की, या संपूर्ण अभियानदरम्यान फायर ब्रिगेड, पोलीस आणि रेड क्रॉसचे ३५० अधिकारी मदतीसाठी उपस्थित होते. 

बॉम्बचा शोध कसा लागला?

रिपोर्ट्सनुसार, ९ एप्रिलला फायर ब्रिगेडची टीम नदीमध्ये डायव्हिंगचा सराव करत होती. यादरम्यान त्यांना हा बॉम्ब आढळला. त्यांनी सुरुवातीला हा बॉम्ब डिफ्यूज करण्याचा प्रयत्न केला. पण हा २५० किलो वजनाचा बॉम्ब डिफ्यूज करताना फुटू शकतो अशी भीती करण्यात आली होती. 

बॉम्ब शोधक पथक हा बॉम्ब नदीत साधारण ५ ते ६ मीटर खोल घेऊन गेले. त्यानंतर या बॉम्बचा धमाका करण्यात आला. नदीतील जीवांना काही धोका होऊ नये म्हणूण नदीत आधी छोटे स्फोट करण्यात आले. जेणेकरुन नदीतील जीव दूर निघून जातील. 

जर्मनीत आताही मिळतात बॉम्ब

भलेही दुसऱ्या महायुद्धाला ७० वर्षे लोटली असली तरी सुद्धा अजूनही त्या काळातील जिवंत सक्रिय बॉम्ब आढळतात. दुसरं महायुद्ध हे १९४५ मध्ये संपलं होतं. यात मोठ्या संख्येने सैनिक मारले गेले होते. त्यावेळी जर्मनीवर टाकण्यात आलेले काही बॉम्ब फुटलेच नाहीत. त्यामुळे हे बॉम्ब आताही फुटण्याचा धोका असतो.   

टॅग्स :Germanyजर्मनीAmericaअमेरिकाBombsस्फोटके