शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

जगातील सर्वात उंच मॉडेलला आहे एक विचित्र समस्या, म्हणते.... मला कुणी बॉयफ्रेंडच मिळत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 12:38 IST

ती इतकी उंच आहे, की तिला एका अजब समस्येचा सामना करावा लागत आहे.

जगात अनेक लोक असे असतात, ज्यांची उंची अतिशय कमी असते आणि त्यांना सतत असं वाटत राहातं की त्यांची उंची जास्त पाहिजे होती. मात्र अनेक लोक असेही असतात, ज्यांची हाईट इतकी जास्त असते, की त्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. असंच काहीसं जगातील सगळ्यात उंच मॉडेलसोबतही होत आहे. ती इतकी उंच आहे, की तिला एका अजब समस्येचा सामना करावा लागत आहे.

रशियाची रहिवासी असलेली इकाटेरिना लिसिना हिची उंची फक्त रशियामध्येच नाही, तर जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या उंचीमुळे तिच्या नावी वर्ल्ड रेकॉर्डही आहे (Guinness World Record). इकाटेरिनाची उंची ६ फूट ९ इंच आहे. तिला जगातील सर्वात लांब मॉडेल म्हणून ओळखलं जातं (Tallest Model in World). याशिवाय तिच्या नावे आणखी एक अजब गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही आहे.

इकाटेरिनाचे पाय जगात सर्वात लांब आहेत. तिच्या पायांची लांबी ४ फूट ३ इंच आहे. याच कारणामुळे तिचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे. इकाटेरिना आधी प्रोफेशनक फूटबॉल खेळाडू होती आणि तिने २००८ साली ऑलम्पिक गेम्समध्ये बॉन्ज मेडलही जिंकलं होतं. मात्र नंतर तिने रिटायरमेंट घेतली आणि मॉडेलिंगच्या जगात पाऊल ठेवलं.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, तिने आपल्याला येणाऱ्या एका मोठ्या समस्येचा खुलासा केला. एका पॉडकास्टमध्ये बोलताना तिने आपल्या रोमँटिक लाईफबद्दल खुलासा केला. तिने सांगितलं की तिच्या उंचीमुळे तिला चांगला मुलगाही मिळत नाही. तिच्या म्हणण्यानुसार, प्रेमात खरं तर उंचीचा काहीही फरक पडत नाही. मात्र लोक त्या कपलकडे वाईट नजरेने पाहातात, ज्यात स्त्री उंच आणि पुरुष ठेगंणा असतो. यामुळे ती स्वतःपेक्षा एक फूटापर्यंत उंची कमी असलेल्या व्यक्तीला डेट करायला तयार असते, मात्र त्यापेक्षा कमी उंचीच्या नाही. तिने सांगितलं की तिला पार्टी करायला जास्त आवडत नाही. यामुळे ती डेटिंग अ‍ॅपवरच मुलांना भेटण्यास प्राधान्य देते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके