World Largest Family: आजकाल अनेकांना संयुक्त कुटुंबाऐवजी लहान कुटुंबात राहणे पसंत आहे. संयुक्त कुटुंबात राहणारे खूप कमी लोक असतात. पण, भारतात एक असे कुटुंब आहे, जे आजही एकत्र राहते. सहसा संयुक्त कुटुंबात १०-१५ लोक असतात. पण, आम्ही ज्या कुटुंबाबद्दल बोलत आहोत, त्यात तब्बल १६७ सदस्य राहतात.
जगातील सर्वात मोठे कुटुंब भारतातील मिझोरम राज्यात आहे. या कुटुंबात एकूण १६७ सदस्य आहेत. हे कुटुंब मिझोरमच्या बक्तवांग गावात १०० खोल्यांच्या चार मजली घरात राहते. या प्रचंड मोठ्या कुटुंबाचे प्रमुख झिओना चाना होते, ज्यांचे २०२१ मध्ये वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले.
झिओना चाना ख्रिश्चन धर्माचे अनुयायी होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक लग्न केले. झिओना यांच्या कुटुंबात ३९ बायका, ९४ मुले, ३३ नातवंडे आणि एक पणतू आहे. विशेष म्हणजे, हे सर्वजण आझही गुण्यागोविंदाने एकत्र राहतात आणि एकत्रच जेवण करतात.
या कुटुंबासाटी दररोज येथे ४५ किलो तांदूळ, २५ किलो डाळ, ६० किलो भाज्या, ३०-४० कोंबड्या आणि २० किलो फळे लागतात. हे कुटुंब इतर इतर सामान्य कुटुंबांप्रमाणेच राहणे पसंत करते. म्हणूनच या कुटुंबाने 'जगातील सर्वात मोठे कुटुंब' असल्याची पदवी स्वीकारण्यासही नकार दिला होता. या कुटुंबाची नेहमी जगभरात चर्चा होत राहते.