शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

ज्या तरूणीचा पोलीस 4 वर्षापासून घेत होते शोध, ती निघाली पोलीस कॉन्स्टेबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 14:30 IST

Delhi Police Woman Constable : मुजफ्फरपूरच्या एका गावातून एक तरूणी दिल्लीला पळून गेली होती. पण तिच्या कुटुंबियांना वाटलं होतं की, त्यांच्या मुलीचं कुणीतरी अपहरण केलं आहे.

Delhi Police Woman Constable : बघितलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लोक काहीही करतात. ते मेहनत करतात आणि हवं ते मिळवतात. पण हेच जर स्वप्न गावातील एका सामान्य मुलीचं असेल तर ते तिच्यासाठी फार जास्त अवघड होऊ बसतं. मात्र जिद्द असेल तर काहीही होऊ शकतं. अशीच एक घटना बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातून समोर आली आहे. तिच्याबाबत वाचून लोक आता तिचं भरभरून कौतुक करत आहेत.

मुजफ्फरपूरच्या एका गावातून एक तरूणी दिल्लीला पळून गेली होती. पण तिच्या कुटुंबियांना वाटलं होतं की, त्यांच्या मुलीचं कुणीतरी अपहरण केलं आहे. दिल्लीला तरूणी तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि आता ही तरूणी दिल्लीत पोलीस कॉन्स्टेबल आहे. चार वर्षाआधी 2018 मध्ये तरूणीच्या वडिलांनी पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पण तरूणीने शिक्षण पूर्ण करून दिल्लीत पोलीस कॉन्स्टेबल बनून दाखवलं. यानंतर सगळेजण तिचं कौतुक करत आहेत.

2018 मध्ये तरूणीच्या वडिलांना तिचं लग्न करून द्यायचं होतं. कारण त्यांचा परिवार फार गरीब होता. त्यामुळे त्यांना वेळीच आपल्या मुलीचं लग्न लावून द्यायचं होतं. पण तरूणीला लग्न करायचं नव्हतं. आपली परिस्थिती बघता तिला काहीतरी करून दाखवायचं होतं. याच कारणाने ती घरातून पळून गेली आणि दिल्लीला राहू लागली. दिल्लीत राहून तिने खूप मेहनत घेतली आणि ती दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून सिलेक्ट झाली. सध्या ती ट्रेनिंग घेत आहे.

टॅग्स :delhiदिल्लीBiharबिहारJara hatkeजरा हटके