शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! बॉयफ्रेंडने घातली 2 लाखांची अंगठी अन् दुसऱ्याच दिवशी गर्लफ्रेंडवर आली बोट कापण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 16:52 IST

बॉयफ्रेंडने तब्बल 2 लाख रुपयांची अंगठी घालून प्रपोज केलं. पण दुसऱ्याच दिवशी तरुणीसोबत विपरित घडलं. बोट कापण्याची वेळ ओढावली आहे.

एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकजण नवनवीन कल्पना शोधत असतात. तर काही जण एखादी छानशी अंगठी देऊन प्रपोज करतात. पण अशाच आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण हा एका तरुणीसाठी प्रचंड त्रासदायक ठरला आहे. एका तरुणीला तिच्या बॉयफ्रेंडने तब्बल 2 लाख रुपयांची अंगठी घालून प्रपोज केलं. पण दुसऱ्याच दिवशी तरुणीसोबत विपरित घडलं. बोट कापण्याची वेळ ओढावली आहे. साऊथ ईस्ट लंडनमध्ये ही घटना घडली आहे. 

पेरिएसा ओरोमेसाठी तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षणच वेदनादायी ठरला. डेटिंगनंतर तिचा बॉयफ्रेंड विलिस ओरोमेने तिला लग्नासाठी प्रपोज केलं. त्याने  दोन लाख रुपयांची अंगठी तिच्या बोटात घातली. त्यानंतर तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. पण हीच अंगठी या कपलसमोर मोठं संकट उभं करेल याची त्यांना कल्पनाही नव्हती. दुसऱ्या दिवशीच अंगठीमुळे तरुणीची इतकी अवस्था भयंकर झाली. तिचं बोट कापण्याची वेळ आली.

दुसऱ्या दिवशी पेरिएसा उठली तेव्हा तिला तिच्या बोटात काहीच संवेदना जाणवत नव्हत्या. तिने अंगठी काढण्याचा प्रयत्न केला. पण ती बोटात इतकी घट्ट बसली होती की काही केल्या निघेनाच. तिने बोटातून अंगठी काढण्याचे वेगवेगळे उपायही यूट्युबवर पाहिले. अगदी साबणापासून बर्फापर्यंत सर्वकाही तिने वापरून पाहिलं. पण तिचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. हळूहळू तिचं बोट सुजू लागलं आणि शेवटी बोटाचा रंगही बदलला. तिचं बोट जांभळं पडू लागले. त्यावेळी ती घाबरली आणि तिने फायर ब्रिगेडलाच फोन केला. 

कटरच्या मदतीने त्यांनी तरुणीच्या बोटातील अंगठी कापून काढली. अंगठी कापून काढताच पेरिएसाच्या त्या बोटातील रक्तप्रवाह सुरळीत झाला आणि बोट नीट झालं. या कपलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लग्न केलं. आपल्या लग्नाआधी झालेल्या हा आपला विचित्र अनुभव त्यांनी सोशल मीडियावर आता शेअर केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.