शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

या भाग्यवान महिलेला तीन आठवड्यात तीनदा लागली लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 6:12 PM

रांगेत तीनवेळा लॉटरी लागल्याने ती महिला एका झटक्याने कोट्याधीश झाली आहे.

ठळक मुद्देत्यातील एक लॉटरी ३ लाख २६ हजार ७७५रुपयांची आहे.त्यातील दुसरी लॉटरी ३२ हजार ६६० रुपयाची आहे.तर तिसरी लॉटरी ३२ कोटी ६६ लाख ३७ हजार ५०० रुपयांची आहे.

व्हर्जिनिया - आयुष्यात एकदा तरी मोठ्या रकमेची लॉटरी लागावी असावं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे कित्येकांना लॉटरी काढण्याचं जणु व्यसनच लागतं. या लॉटरीच्या तिकिटांमध्येच कित्येकांचे हजारो रुपये खर्च झालेले आहेत.  तरीही एकदाच मोठी रक्कम मिळावी याकरता लॉटरीप्रेमी लॉटरी काढतातच. त्यात फार कमी लोकांना यश मिळतं. म्हणजे लॉटरीच्या बाबतीत फार कमी लोक भाग्यवान ठरतात. युएसमध्ये राहणाऱ्या ब्रेंडा जेंट्री यांना एक-दोन नव्हे तर तब्बल तीनवेळा लॉटरी लागली आहेत. तीनही लॉटरी काही आठवड्यांच्या कालावधीतच लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या लॉटरीमधून ब्रेंडा यांना तब्बल ५ मिलिअन डॉलर मिळाले आहेत. 

व्हर्जिनिया येथे राहणारी ब्रेंडा जेंट्री यांना सुरुवातीला ५ हजार डॉलर (३ लाख २६ हजार ७७५) नंतर ५०० डॉलर (३२ हजार ६६०) आणि मग थेट ५ मिलिअन डॉलर (३२ कोटी ६६ लाख ३७ हजार ५००) रुपयांची लॉटरी लागलीय. व्हर्जिनिया येथील लॉटरी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ब्रेंडा यांनी ‘५० एक्स मनी’ ही लॉटरी काढली होती. ब्रेंडा यांनी ही लॉटरी त्यांनी स्क्रॅच केली तेव्हा त्यांना धक्काच बसला. आयुष्यात एका झटक्यात बदल व्हावा यासाठी लोक लॉटरी काढतात. पण प्रत्येकाला लॉटरी लागेलच असं नसतं. फार कमी लोकांना आजवर मोठ्या रक्कमेची लॉटरी लागली आहे. मात्र सलग काही आठवड्यांच्या अंतराने तीन वेळा लॉटरी लागलेल्या ब्रेंडा या पहिल्याच असतील. 

आणखी वाचा - मालकाने बेवारस सोडून दिल्याने कुत्रीने सोडला प्राण

ही रक्कम घेण्यासाठी ब्रेंडा यांच्याकडे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ३० वर्षांच्या कावाधीत दर महिन्याला एक ठराविक रक्कम कंपनीकडून घ्यायची किंवा एकाचवेळी ही सगळी रक्कम स्विकारायची.  नुकताच त्यांनी ५ मिलिअन डॉलरचा चेक स्विकारला आहे. साहजिकच एवढ्या मोठ्या रकमेने कोणाचंही आयुष्य एका क्षणात बदलू शकतं. त्यामुळे ब्रेंडा यांच्या आयुष्यातही मोठा बदल होणार आहे. कित्येक लोक लॉटरीचं तिकिट काढतात. मात्र त्यात ते भाग्यवान ठरत नाहीत. त्यामुळे अनेकांनी लॉटरीचं तिकिट घेण्याचं प्रमाण कमी केलंय. पण ब्रेंडा यांना सलग तीनवेळा लागलेल्या लॉटरीचं तिकिट घेण्याचं प्रमाण आता वाढण्याची शक्यता आहे. 

सौजन्य - firenewsfeed.com

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयWomenमहिलाUSअमेरिका