शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याच्या पडली प्रेमात, आता करणार त्याच्यासोबत लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 09:48 IST

Love Story : ब्रिजेटला माहीत आहे की, टॉमी नेहमीसाठी तुरूंगातच राहणार आहे. तरीही तिने त्याच्यासोबत साखरपुडा केला आणि लवकरच लग्नही करणार आहे.

Bridget-Tommy Walden Love story: लव्हस्टोरी तर तुम्ही अनेक ऐकल्या, पाहिल्या आणि वाचल्या असतील, पण आज आम्ही तुम्हाला एका अशा महिलेची कहाणी सांगणार आहोत जी एका कैद्याच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत ती लग्न करणार आहे. या महिलेचं नाव ब्रिजेट वॉल आहे. ब्रिजेटने प्रेम मिळवण्यासाठी कुटुंबिय, मैत्रिणी आणि आजूबाजूच्या लोकांना दूर केलं. ब्रिजेट ज्याच्यावर प्रेम करते त्याचं नाव टॉमी वाल्डेन आहे. ब्रिजेटला माहीत आहे की, टॉमी नेहमीसाठी तुरूंगातच राहणार आहे. तरीही तिने त्याच्यासोबत साखरपुडा केला आणि लवकरच लग्नही करणार आहे.

कशी झाली सुरूवात

ब्रिजेटने सांगितलं की, 16 वर्षांची असताना तिचं घरच्यांनी एक लग्न करून दिलं होतं. पण पती तिच्यासोबत चांगला वागत नव्हता. त्यामुळे हे लग्न फार जास्त काळ टिकलं नाही. यातून तिला चांगलाच धक्का बसला होता. मग बऱ्याच वर्षानी तिच्या आयुष्यात टॉमी वाल्डेन आला आणि सगळं काही बदललं.

ब्रिजेटने सांगितलं की, टॉमीने मला जाणीव करून दिली की, मी जगातील सगळ्यात सुंदर महिला आहे. जिच्यावर तो प्रेम करतो. ब्रिजेट सांगते की, टॉमीसोबत तिची पहिली भेट तुरूंगात झाली होती. तुरूंगात जाण्याआधी टॉमी तिला टिकटॉकवर फॉलो करत होता. तिला मेसेज करत होता. दरम्यान त्याला तुरूंगात जावं लागलं. त्यानंतर बरेच दिवस त्याचे तिला मेसेज आले नाहीत.

जेव्हा ब्रिजेटची चुलत बहीण तुरूंगात गेली तेव्हा तिची भेट टॉमीसोबत झाली. बोलता बोलता ब्रिजेटचा उल्लेख झाला. तेव्हा टॉमी तिला म्हणाला की, तो या तरूणीला ओळखतो. टॉमीने तिला सांगितलं की, त्याला ब्रिजेट आवडते आणि तिच्यावर प्रेम करतो. त्यानंतर ब्रिजेटच्या चुलत बहिणीने दोघांचं बोलणं करून दिलं. तेव्हापासून त्यांचं बोलणं सुरू झालं.

ब्रिजेट म्हणाली की, तिला टॉमीसोबत बोलणं आवडत होतं. टॉमी एक फार चांगला व्यक्ती असल्याचं ती सांगते. त्यानंतर हळूहळू दोघांचं प्रेम वाढत गेलं. ब्रिजेट सांगते की, ती जेव्हा पहिल्यांदा टॉमीला भेटली तेव्हा तो तुरूंगात होता. ती फार नर्वस होती. कारण ती याआधी कुणालाही अशी तुरूंगात भेटली नव्हती. ब्रिजेटला एका महिन्यात 3 वेळा टॉमीला तुरूंगात भेटण्याची परवानगी होती.

ब्रिजेटचे कुटुंबिय, नातेवाईक या नात्याने नाराज होते. त्यामुळे ब्रिजेटला त्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. पण ब्रिजेटचे कुणाचं ऐकलं नाही. ब्रिजेटने सगळ्यांना दूर करून प्रेमाची बाजू घेतली. ब्रिजेटने टॉमीसोबत साखरपुडा केला. आता ती लवकरच लग्नही करणार आहे.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टJara hatkeजरा हटके