शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! महिलांचे ब्युटी प्रोडक्ट्स वापरायचे सोडून पुरुषांचे प्रोडक्ट वापरते ही महिला, करते शेविंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 13:57 IST

एका महिलेला मात्र ब्युटी नव्हे तर चक्क मेन्स प्रोडक्ट्सच्या जाहिरातीत काम करण्याची इच्छा आहे. तिने कंपनीकडेही याबाबत विचारणा केली आहे. आता ही महिला पुरुषांच्या उत्पादनासाठी काम कऱण्यासाठी उत्सुक का? यामागे एक धक्कादायक कारण आहे.

आपण एखाद्या जाहिरातीत झळकावं असं कुणाला वाटणार नाही. महिला असतील तर त्यांना ब्युटी प्रोडक्ट्सच्या जाहिरातीत काम करायला आवडेल. पण एका महिलेला मात्र ब्युटी नव्हे तर चक्क मेन्स प्रोडक्ट्सच्या जाहिरातीत काम करण्याची इच्छा आहे. तिने कंपनीकडेही याबाबत विचारणा केली आहे. आता ही महिला पुरुषांच्या उत्पादनासाठी काम कऱण्यासाठी उत्सुक का? यामागे एक धक्कादायक कारण आहे (Woman want men product ad).

सारे असं या महिलेचं नाव आहे. तिला पीसीओएस (PCOS) म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आजार आहे. ही एक हार्मोन्ससंबंधी समस्या आहे. यामुळे शरीरातील हार्मोन्सची पातळी बिघडते. या आजारामुळे सारेच्या चेहऱ्यावर केस येतात. म्हणजे तिला पुरुषांसारखी दाढी येते. तिने वयाच्या अठराव्या वर्षी आपल्या चेहऱ्यावरील अतिरिक्त केस हटवण्यासाठी लेझर थेरेपीही घेतली. पण तिला काहीच फायदा झाला नाही. अखेर तिच्यासमोर रेझरचा वापर करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता.

गेल्या १२ वर्षांपासून ती शेव्हिंग करत आहे. त्यामुळे आता आपल्याला शेव्हिंगसंबंधी उत्पादनाची जाहिरात करायची आहे, अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. जिलेट कंपनीशी तिने याबाबत संपर्कही केला. पुढच्या रेझर जाहिरातीत आपला चेहरा घ्यावा अशी विनंती तिने केली.

टिकटॉकवर व्हिडीओ पोस्ट करत सारे सांगते, आपल्याला गेल्या १२ वर्षांचा शेव्हिंगचा अनुभव आहे आणि ती जाहिरात आपल्यासाठी एकदम फीट राहिल. आपल्यासारखं कुणालातरी जाहिरातीत पाहून लोकांनाही बरं वाटेल. पुरुषांच्या प्रोडक्टसाठी जाहिरात करणारी ती पहिली महिला  असेल, अशी आशाही तिने व्यक्त केली आहे. द सनच्या रिपोर्टनुसार सारेच्या या इच्छेला अनेक महिलांनी सपोर्ट केला आहे. पीसीओएस पीडित महिलांसाठी तिने रेझरच्या जाहिरातीचं नेतृत्व करायला हवं, असं अनेक महिला युझर्सनी म्हटलं आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके