शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बेडरूममध्ये विवाहित महिलेसोबत सोबत होता नवरदेव, तेव्हाच तिथे पोहोचली नवरी आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 15:19 IST

Wife Caught Husband Red Handed : ती साधारण तीन वर्षांपासून तिच्या होणाऱ्या पतीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण तिला काहीच कळालं नाही की, ती असतानाही तो काय करतोय.

Wife Caught Husband Red Handed : एका महिलेने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला रंगेहाथ पकडण्याची कहाणी सांगितली आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून सांगितलं की, ही घटना त्या दिवशी झाली, ज्या दिवशी दोघांचं लग्न होणार होतं. तिने होणाऱ्या नवऱ्याच्या रूमचा दरवाजा उघडला आणि यावेळी तिला असं काही दिसलं ज्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती साधारण तीन वर्षांपासून तिच्या होणाऱ्या पतीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण तिला काहीच कळालं नाही की, ती असतानाही तो काय करतोय. क्रिस्टीन नावाच्या या महिलेने टिकटॉकवर तिच्यासोबत झालेली घटना सांगितली.

ती म्हणाली की, असं अनेकदा जाणवलं की, तिचा होणारा पती त्याच्या विवाहित सहकारी महिलेसोबत काहीतरी चुकीचं करत आहे. पण तो तिला नेहमी एक मूर्ख महिला म्हणत होता. पण क्रिस्टीनला दोघांवरही संशय होता. त्यामुळे ती तिच्या होणाऱ्या पतीसोबत लग्नाच्या एक दिवसाआधी एका काउन्सेलरकडे गेली. पण त्यांना सांगण्यात आलं की, सगळं काही ठीक आहे. दोघांनी लग्न टाळण्याचाही विचार केला होता. मग एक दिवस क्रिस्टीनने जे पाहिलं ते बघून तिला धक्का बसला.

महिलेने सांगितलं की, 'आम्ही 2014 मध्ये एकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं आणि 30 सप्टेंबर 2017 ला आम्ही लग्नही करणार होतो. पण लग्नाच्या पाच दिवसाआधी मला जाणवलं की, तो ज्या महिलेसोबत काम करतो, तिच्यासोबत काहीतरी चुकीचं होत आहे. मग मी त्याला विचारलं'. यानंतर क्रिस्टीनच्या होणाऱ्या नवऱ्याने लग्न टाळण्यास सांगितलं. तो तिला म्हणाला की, तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये.

क्रिस्टीन म्हणाला की, तिला समजतच नव्हतं की, तिला होणारा नवरा दगा देत आहे किंवा तो वास्तविकतेपासून दूर आहे. तिने लग्नानंतर राहण्यासाठी जे घर घेतलं होतं ते तिथे गेले. जेव्हा तिने दरवाजा उघडला तेव्हा ती हैराण झाली.

ती पुढे म्हणाली की, 'मी घराचा दरवाजा उघडला आणि आत गेले. तेव्हा त्याच्या अंगावर कपडे नव्हते. मला त्याने विचारलं की, मी तिथे काय करत आहे. मला खाली महिलेचे शूज दिसले. मी बेडरूमचा दरवाजा बंद होण्याचा आवाज ऐकला आणि जेव्हा तिथे गेले तेव्हा ती महिला दिसली. तिने तिचे कपडे घातले होते'. व्हिडीओच्या दुसऱ्या भागात क्रिस्टीनने सांगितलं की, मी जेव्हा त्या महिलेसोबत बोलले तेव्हा समजलं की, तिचं माझ्या होणाऱ्या नवऱ्यावर प्रेम आहे. दोघांचं अनेक महिन्यांपासून अफेअर सुरू आहे.

ती म्हणाला की, होणाऱ्या नवऱ्याकडे पैसे नव्हते तरीही तिने तिच्या पैशांनी घर खरेदी केलं आणि ते दोघांच्या नावावर केलं. आता कायदेशीर लढाईनंतर तिला तिचं घर परत मिळालं आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल